Osmanabad News 
मराठवाडा

विषाणू घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गोवऱ्या-तुळशीचा धुपारा

सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनासंबंधी काळजी घ्या; मात्र घाबरू नका, अफवा पसरवू नका. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी गुरुवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान, यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गोवऱ्या, तुळस, कडूनिंबाचा धूप करून विषाणू घालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविल्याने उपस्थित पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पत्रकार परिषदेतच हा प्रकार घडल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र हे प्रात्यक्षिक कोरोना विषाणू घालविण्याचा प्रकार नसल्याचा खुलासा यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी कोरोना आजाराविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे कोरोना विषाणूविषयी म्हणाल्या, की नागरिकांनी याबाबत जास्तीची भीती बाळगू नये. एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप आला म्हणजे त्याला कोरोना विषाणूची लागण झाली असे समजण्याचे कारण नाही. फक्त संशयित व्यक्तीचा संपर्क बाहेरच्या देशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क झाला आहे का? किंवा पुणे अथवा बाहेरच्या देशातून तो आला आहे की नाही, याची माहिती डॉक्टरांना द्यावी. त्यानंतर त्यांची तपासणी केली जाते.

संबंधित तपासणीत पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वेगळ्या कक्षामध्ये ठेवले जाते. याशिवाय कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचे मृत होण्याचे प्रमाण केवळ १.४ टक्के आहे. प्रामुख्याने शुगर असलेले रुग्ण, वयोवृद्ध याला बळी पडतात. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. गेले तरी हातरुमाल, मास्क वापरावेत. साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक रौशन यांनीही यावेळी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. 

प्रात्यक्षिकाने गडबड 

दरम्यान, याचवेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी गोवऱ्या (शेणाच्या), कडूनिंबाचा पाला, तुळशीची पाने जाळून धूप (धूर) करण्यात आला. घर, परिसरातील विषाणू घालविण्यासाठी हा प्रयोग करू शकता, असा संदेश यावेळी देण्यात आला.

दरम्यान, हा प्रकार कोरोना विषाणू घालविण्याचा आहे की काय? अशी चर्चा यावेळी सुरू झाल्याने गडबड झाली. मात्र कोरोना विषाणू घालविण्याचा हा प्रकार नसल्याचा खुलासा मुधोळ-मुंडे यांनी केल्याने या प्रकारावर पडदा पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT