justice.jpg 
मराठवाडा

लातूर : अल्पवयीन भाचीसोबत अश्लील चाळे; मामाला तीन वर्ष कारावास

हरी तुगावकर

लातूर : अल्पवयीन भाचीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या तीस वर्षीय मामाला येथील विशेष सत्र न्यायाधिश बी. एस. कांबळे यांनी तीन वर्ष कारावास आणि दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

खंडापूर (ता. लातूर) येथील ईस्माईल सुभाष दंडगुले याने (ता.२५) जानेवारी २०१८ रोजी आपली अल्पवयीन भाची व तीची बहिण घरात असताना आतमध्ये प्रवेश केला. पिडीत बालिकेच्या लहान बहिणीला फेव्हीकॉल आणण्यासाठी घरा बाहेर पाठवले व त्यानंतर पिडीत बालिकेसोबत अश्लिल चाळे केले होते. या बालिकेने घडलेला प्रकार घरातील इतर व्यक्तींना सांगितला. त्यानंतर या प्रकरणी ईस्माईल दंडगुले याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणी पोलिसांनी दंडगुले यास अटकही केली होती. काही महिने तो जेलमध्येही राहिल. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच कागदोपत्री पुरावाही न्यायालयात सादर करण्यात आला. या प्रकरणात पिडीत बालिका, तीची लहान बहिण आणि घटननंतरचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा ग्राह्य धरून विशेष सत्र न्यायाधिश बी. एस. कांबळे यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये ईस्माईल दंडगुले याला ता.२२ जुलै रोजी तीन वर्ष सश्रम कारावास दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकिल शिवनारायण रांदड, विशेष सरकारी वकिल मंगेश महिंद्रकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. उमाकांत राऊत, ॲड. अंकिता धूत, ॲड. विद्या वीर  यांनी सहकार्य केले. या प्रकरणात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुमित्रा मुंडे, आवेज काझी, पोलिस नाईक श्रीमती पी. आर. सगर, ज्ञानोबा पवार यांचेही त्यांना सहकार्य मिळाले.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion News : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Jalna News: मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका; सावळा गोंधळ, मंठा तालुक्यातील घटना

कोण होते अयातुल्लाह अली खामेनेई? ४ दशकांपासून इराणची सत्ता हातात, अमेरिकेला मानायचे नंबर एकचा शत्रू

Caste-based discrimination : जातिभेद का संपला नाही?

Shyam Manohar Books Marathi : हत्या आणि माणुसकीचा संघर्ष!

SCROLL FOR NEXT