Aurangabad news  
मराठवाडा

Video : हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या : चंद्रकांत पाटील

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्यातील गावा-गावातले रस्ते, १२ हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

जे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, ते रद्द करून काय मिळवणार आहात, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचं नाव न घेता केला आहे. 

आज औरंगाबादमध्ये भाजपची विभागीय आढावा बैठक होत आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह मराठवाड्यातील प्रदेश पातळीवरील नेत्यांची उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी 'साम टीव्ही'शी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेते. थोडक्यात काय तर त्यांना काहीच करायचं नाही' असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सारथीसारख्या स्वायत्त संस्थेवर मर्यादा आल्यामुळे मराठा आणि कुणबी समाजातून प्रतिक्रिया उमटतील. त्यामुळे सरकारला आवाहन आहे की, काय पंगा आहे, तो तुमचा आमचा राजकीय आहे. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेऊ नका, असे आवाहनही पाटील यांनी ठाकरे सरकारला केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

ढिंग टांग : जल बिन मछली, नृत्य बिन बिजली..!

वेट ट्रेनिंगकडे दुर्लक्ष नकोच

दृष्टिकोनातील बदलाचा प्रवास

लवचीक व्यक्तिमत्त्व

SCROLL FOR NEXT