तुळजाभवानी मातेचे मंदिर.jpg
तुळजाभवानी मातेचे मंदिर.jpg 
मराठवाडा

तुळजापूरात मंदिर प्रशासनाची पुजाऱ्यांवर हुकूमशाही; आमदार राणांच्या बैठकीनंतर घडला प्रकार

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात शिस्तीचे पालन न करणाऱ्या पुजाऱ्यांवर त्वरीत कारवाईचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना तुळजा भवानी देवस्थान समितीचे व्यवस्थापक (प्रशासक) तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक एस. एस. इंतुले यांना (ता.21) दिला आहे. 

तहसीलदार सौदागर तांदळे यांनी श्री इंतुले यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुळजा भवानी मातेच्या गाभाऱ्यात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले असून आमदार राणाजगजितसिंह पाटील तथा तुळजा भवानी मंदीर समितीचे विश्वस्त यांच्या अध्यक्षतेखाली  शनिवारी (ता.21) नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आलेला आहे. या पत्रामध्ये श्री. तांदळे यांनी श्री इंतुले यांना सूचित केले की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात भाविकांना 26 मार्च 2020 पासून प्रवेशास मनाई करण्यात आली होती. तथापी राज्य सरकारने 14 नोव्हेंबरला धार्मिळ स्थळे खूली केली आहेत. त्यासाठी काही नियमावली लावून दिली आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल.

तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून सिंहाच्या गाभाऱ्यात चोपदार दरवाज्यासमोर तसेच भवानीशंकराच्या गाभाऱ्यातून भक्तांना केवळ प्रवेश दिला जाणार आहे. भक्तांसमवेत गाभाऱ्यात प्रवेश करणारे पुजारी यांना गाभाऱ्यात कोणत्याही प्रकारचे कुलाचार, कुळधर्म अथवा ओटी भरणे इत्यादी धार्मिक विधी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे पुजाऱ्यांकडून बेशिस्त वर्तन करण्यात आले. किंवा नियमांचे उल्लंघन करण्यात आले. तर अशा पुजाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात तुम्ही प्रस्तावित करणे गरजेचे आहे. तहसीलदारांकडून आलेल्या या पत्रामुळे तुळजापूरात भाविकांसह पुजारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे. एक प्रकारे आमदारांच्या बैठकीनंतरच प्रशासनाकडून पुजारी बांधवांची गळचेपी केली जात आहे, असा आरोपही होऊ लागला आहे.  

पाटील यांच्या बैठकीचा काही संबंध नाही 
तुळजापुरचे नगराध्यक्ष श्री. रोचकरी याबाबत म्हणाले की, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सदर बैठकीमध्ये गाभार्यात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांवरती कारवाई करण्याचे पत्रक काढण्यात आले आहे. तथापि या पत्राचा कुठलाही संबंध आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा नाही. तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये असे त्यांनी सांगितले. पुजारी बांधवांना भाविकांसोबत गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करण्यासाठी मागणी मान्य करण्यात आली आहे. तथापि गाभाऱ्यामध्ये कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुजा करता येणार नाही असे पुजारी आणि मंदीर संस्थान यांच्यामध्ये ठरले आहे. त्या संबंधीत पुजारी जबाबदार राहील असेही श्री रोचकरी यांनी सांगितले.

अधिकारी सांगतील तसे वागावे लागते 
दरम्यान तुळजाभवानी मंदिरात अधिकारी दिशा देतील तसे विश्वस्त ऐकतात अशीही चर्चा शहरात चालू आहे. तुळजाभवानी मंदीरात मागील आठ ते नऊ महिन्यांपासून तुळजा भवानी मंदीर बंद असून ही पुजार्यांनी सर्व सूचनांचे पालन आतापर्यंत केलेले आहे. मंदिरात दश॔न मंडपातून पुजाऱ्यांना सिंहाच्या गाभार्यात प्रवेश दिला जात आहे. शहरातील पुजारी व्यावसायिकांना मिळणार्या वागणुकीबाबत ही मोठी खदखद निर्माण झाली आहे. तुळजाभवानी मंदीरात वर्षानुवर्षे प्रशासनातील अधिकार्यांच्या अध्यतेखालील बैठका यापूर्वी होत असल्याचे दिसून आले. आज रविवारी (ता.22) दुपारी चार वाजेपर्यंत अजून मंदीरात कोणतेही फेरबदल पुजारी मार्गाबाबत झाले नसल्याचे सांगण्यात आले. तुळजाभवानी मंदिराकडून शुद्धीपत्रक काय निघते याकडेही लक्ष लागलेले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT