file photo 
मराठवाडा

मोफत तांदळाचे वितरण नांदेड जिल्ह्यात सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेतील मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु करण्यात आले आहे. सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना तीन महिन्‍यांचा शिधा एकत्रितरित्‍या उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. या सुचनांमध्‍ये बदल करुन आता शासनाने असा निर्णय घेतला आहे.

पीओएस मशीनमार्फत वाटप होणार
एप्रील, मे व जून या तीन महिन्यासाठी अन्‍नधान्‍याच्‍या दिलेल्‍या नियमित नियतनानुसार अंत्‍योदय कार्ड धारकांना २३ किलो गहू व १२ किलो तांदुळ असे एकूण ३५ किलो धान्‍य, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ आणि ए. पी. एल. शेतकरी यांना प्रति व्‍यक्‍ती गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो (सर्व योजनांसाठी गहू दोन रुपये व तांदुळ तीन रुपये किलो) या प्रमाणे वाटप त्‍या - त्‍या महिन्‍यात करण्यात येणार आहे. एप्रील, मे व जून या तीन महिन्‍याचे वरीलप्रमाणे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना ज्‍यामध्‍ये प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति सदस्‍य प्रतिमाह पाच किलो तांदुळ (मोफत) त्‍याचबरोबर अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांना शिधापत्रिकेतील सदस्‍य संख्‍येनुसार प्रति सदस्‍य पाच किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्‍यात येणार आहे. या दोन्‍ही प्रकारचे वाटप पीओएस मशीन मार्फत होणार आहे. 

मोफत तांदळाचे वितरण सुरु
सध्‍या नांदेड जिल्‍हयातील नायगाव, हदगाव, बिलोली, नांदेड, मुदखेड, कंधार तालुक्‍यात मोफत तांदळाचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यामध्‍ये मोफत तादुळाचे वितरण सुरु होणार आहे. मोफत तांदुळ एपीएल शेतकरी लाभार्थी यांना मिळणार नाही. या बाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍तधान्‍य दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.        

लाभार्थ्‍यांना वितरणासाठी धान्य उपलब्‍ध
नांदेड जिल्‍ह्यात एकूण एक हजार ९९३ रास्‍त भाव दुकानदार असून या सर्व रास्‍त भाव दुकानदार यांना सर्व योजनेचे एप्रिलसाठी २४ हजार २०६ मेट्रिक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. ता. १२ एप्रिलपर्यंत एप्रिल महिन्याचे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण नांदेड जिल्‍ह्यातील एक हजार ९९३ रास्‍त भाव दुकानदाराकडून  अंत्‍योदय योजनेचे दोन हजार २५.८५, प्राधान्‍य कुटुंब योजनेचे पाच हजार ८२८ आणि केशरी (शेतकरी) योजनेचे एक हजार २९४.६२ असे एकूण नऊ हजार १४८.६२ मेट्रिक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना वितरण करण्‍यात आले आहे.

रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मदत
अन्‍न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील. अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्‍यांचे वार्षीक काैटुंबीक उत्‍पन्‍न एक लाखाच्‍या आत आहे. अशा लाभार्थ्‍यांसाठी मे व जून या दोन महिन्यांच्‍या कालावधीसाठी प्रतिमाह प्रतिव्‍यक्‍ती तीन किलो गहु (आठ रुपये प्रतिकिलो प्रमाणे), व तांदुळ दोन किलो (बारा रुपये प्रतिकिलो प्रमाणे)  दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन व जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी दिली आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: मानलं संजू सॅमसन ! तापाने फणफणला होता, उपचार घेऊन हॉस्पिटलमधून थेट मॅच खेळायला आला अन्...

Viral Video : भटक्या कुत्र्यांपेक्षा यांचाच राडा! पोलिसांपुढंच रिलस्टार महिलेनं केला खतरनाक डान्स; नेटकऱ्यांनी म्हणाले तुम्हाला लाज...

Ring Road: गोल्डन रिंगरोडमुळे नागपूर होणार नवे आर्थिक केंद्र; चार ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्लाझा, १४८ किमी लांबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवात मुंबईतील 'या' ठिकाणांना भेट देऊ नका, पावसामुळे होऊ शकतो त्रास

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती घरी आणताय? मग 'हे' ७ नियम नक्की पाळा

SCROLL FOR NEXT