Jagannath Dikshit 
मराठवाडा

लाॅकडाऊनमध्ये करा दुप्पट व्यायाम; लाइफस्टाईल गुरू डॉ. दीक्षितांचा सल्ला

विकास गाढवे

लातूर : लॉकडाऊनमुळे वजन कमी करण्याची (वेटलॉस) चांगली संधी चालून आली आहे. यामुळे दोन वेळा जेवण आणि पंचेचाळीस मिनिटांत साडेचार किलोमीटर चालण्याची नेहमीची जीवनशैली कायम ठेवण्यासोबत वजन कमी करण्यासाठी दुप्पट व्यायाम करा. चालणे शक्य नसेल तर ह्रदयाची गती वाढवणारा कोणताही व्यायाम करा. गरम किंवा कोमट पाणी पिण्यासह ताजे पदार्थ खाण्यातून कोरोनाला हरवणारी रोगप्रतिकारशक्ती वाढवा, असा सल्ला लाइफस्टाईल गुरू डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊनच्या निमित्ताने लोकांच्या जीवनशैलीत झालेला बदल व त्यानुसार आवश्यक आहार व व्यायामाची माहिती देताना `सकाळ`शी ते बोलत होते. डॉ. दीक्षित म्हणाले, ``पॅकफूड टाळून ताजे पदार्थ खा. जेवणाच्या सुरवातीला ड्रायफुट्स किंवा एखादे फळ खावे. त्यानंतर काकडी, टोमेटो, गाजराचा समावेश असलेले वाटीभर सॅलड खावे. त्यानंतर वाटीभर मोड आलेले कडधान्य किंवा उकडलेली अंडी खावी. आणि त्यानंतर भूक असेल तरच पोळी भाजी किंवा वरण भात असे पदार्थ खावे. दूध आवडत असेल तर प्यावे. लॉकडाऊनच्या काळात अशा क्रमाने हे अन्नपदार्थ खायचे आहेत. हे सर्व अन्नपदार्थ दोनवेळच्या जेवणात आवश्यक नाहीत. मधुमेही किंवा पूर्वमधुमेही असाल तर कोणत्याही प्रकारचे गोडफळ किंवा गोड पदार्थ खायचे नाही. भाजीपाला किंवा फळे बाजारातून आणल्यानंतर पाण्यात अर्धा ते एक तास भिजवून ठेवावीत. त्यानंतर ते पुसून किंवा वाळवून वापरावेत. मधुमेही रूग्णांनी नेहमीचा डायट प्लॅन चालूच ठेवावा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून स्वतःच्या आजारासह कोरोनापासून ते दूर राहू शकतात.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
- गरम किंवा कोमट पाणी प्या. सहन तेवढे दिवसभर गरम पाणी प्या.
- स्वयंपाकात हळद, जीरे, धने आणि लसूनाचा समावेश करा.
- रात्रीच्या जेवणानंतर शेवटी अर्धा चमच्या हळद घातलेले दूध घ्या.
- घसा बसल्यास कोमट पाण्यात मिठ व हळद टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा
- नाकात दोन थेंब चांगले तुप किंवा खोबरेल तेल टाका. यामुळे नाकातील अंतत्वचा निरोगी राहिल

व्यायामाचा आनंद घ्या
लॉकडाऊनमुळे खूप वेळ असल्याने वजन कमी करण्यासाठी दुप्पट व्यायाम करा. वजन कमी होईल. चालणे शक्य नसेल तर  स्टेशनरी सायकल, स्पॉट जॉगींग, जोर बैठका, सूर्यनमस्कार, जीणे चढणे उतरणे असे ह्रदयाची गती वाढवणारे कोणतेही व्यायाम ४५ मिनिटे करा. आजार लपवू नका. बाहीमध्ये खोका व शिंका. वास येत नसेल व चव कळत नसलेल्या आजारातही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमच्या ADORE ट्रस्टच्या यु ट्युब चॅनेलवर व्हिडिओ पाहून व्यायामाचा आनंद घ्या.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT