umarga news sheti.jpg
umarga news sheti.jpg 
मराठवाडा

रानाला येईना वापसा!

अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यात अतिवृष्टीने शेतजमिनीचे वाटोळे केले. रब्बी हंगामातील पेरणीचे दिवस असले तरी तूर्तास पेरणी शक्य नाही. दरम्यान, शेतात वाढलेले तण, पाण्याची स्थिती असल्याने रानाला वापसा येण्यासाठी आणखी बरेच दिवस लागतील. काही मोजक्या ठिकाणच्या जमिनीवर पेरणी करण्याचे धाडस करताहेत. 


तालुक्यात अतिवृष्टीने खरिपाची पिके पाण्यात अडकल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. आता रब्बी हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. मात्र, अतिवृष्टीने जमिनी पेरणीसाठी तयार व्हायला आणखी बरेच दिवस लागणार असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीच्या दुरुस्तीला वेळ द्यावा लागत आहे. वाढलेले तण काढण्यासाठी मजुराचा शोध लागत आहे. 

हरभरा, उसाचे क्षेत्र वाढणार 
तालुक्यात रब्बीचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात जवळपास वीस हजार हेक्टरवर हरभरा पेरणी होऊ शकते. किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणीची शक्यता आहे. गव्हाचे क्षेत्रही वाढेल. पाच नोव्हेंबरपर्यंत ज्वारीची पेरणी करणे अपेक्षित असते. मात्र, इतक्या घाई - गडबडीत पेरणीसाठी जमीन तयार करणे शक्य नसल्याने यंदा ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत हरभरा व गव्हाची पेरणी शक्य असल्याने याचे क्षेत्र वाढेल. शिवाय यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने उसाचे क्षेत्रही वाढेल अशी स्थिती आहे. चढावर असलेल्या चांगल्या प्रतीच्या शेतजमिनीवर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल. 

अतिवृष्टीने शेतजमिनी रब्बी पेरणीसाठी तयार होण्यास विलंब होणार आहे. काही मोजक्याच क्षेत्रावर पेरणी सुरू आहे. मर रोग लागू नये याची दक्षता घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी करताना बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. पेरणीला विलंब होणार असल्याने यंदा उसाचे क्षेत्र वाढेल. 
- सुनील जाधव, तालुका कृषी अधिकारी 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT