accident sakal
मराठवाडा

Hinogli | हिंगोलीत लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, ८ जण जखमी

हिंगोलीत लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात

राजेश दारव्हेकर

हिंगोली : आजेगाव-गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात सोमवारी (ता.सहा) सकाळी दहा ते साडेदहा यावेळी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेंपोचा अपघात (Hingoli Accident News) झाला. यात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी हिंगोली (Hingoli) येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील वऱ्हाडी मंडळी टेम्पोने लग्नासाठी गोरेगाव येथे जात होते.(Eight People Injured In Accident In Sengaon Taluka Of Hingoli)

यावेळी आजेगाव-गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात अचानक एक दुचाकी-टेम्पोसमोर आली. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टेम्पो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघातात शेख इमरान, शेख करीम, शेख समीर, शेख अमन, सोहिल कुरेशी निलेश दळवी, शेख बशीर, शेख इर्शाद हे जखमी झाले.

या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांनी व्हॅनबाहेर काढून उपचारासाठी तातडीने हिंगोलीला एका खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. या जखमींवर येथे उपचार करण्यात आले. जखमींपैकी चौघांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT