लिंकन (इंग्लड) ः पृथ्वीराज चेडे यास मानाची जर्सी भेट देऊन त्याचे कौतुक करताना इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ग्रॅंट ब्राऊन.
लिंकन (इंग्लड) ः पृथ्वीराज चेडे यास मानाची जर्सी भेट देऊन त्याचे कौतुक करताना इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ग्रॅंट ब्राऊन.  
मराठवाडा

इंग्लंडच्या फुटबॉलपटूकडून पृथ्वीराजला मानाची जर्सी

नेताजी नलवडे

वाशी (जि. उस्मानाबाद) : इंग्लंड येथे झालेल्या फुटबॉल लीगमध्ये शहरातील पृथ्वीराज चेडे या युवकाने उल्लेखनीय कामगिरी करीत नावलौकिक मिळविला आहे. पृथ्वीराजने कर्णधारपद सांभाळत स्वतः चार गोल करून संघाला विजय मिळवून दिला. येथील शिवसेना नेते प्रशांत चेडे यांचा तो धाकटा मुलगा असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अभिनंदनाचा वर्षाव 
वाशीसारख्या (जि. उस्मानाबाद) ग्रामीण भागातील पृथ्वीराजने इंग्लंड येथे झालेल्या फुटबॉल लीगमध्ये सहभाग नोंदवून कर्णधारपद सांभाळत संघाला विजय मिळवून दिला. या यशाबद्दल इंग्लंड येथील प्रसिद्ध फुटबॉलपटू ग्रॅंट ब्राऊन यांनी पृथ्वीराज चेडे यास मानाची जर्सी भेट देत त्याचे कौतुक केले. या यशाबद्दल पृथ्वीराजचे शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत, शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पंडितराव चेडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणोरावजी देशमुख, वडील प्रशांत चेडे, आई प्रियांका चेडे, नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद जोशी, आण्णासाहेब देशमुख, भैरवनाथ शुगर वर्क्‍सचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह नागरिकांनी अभिनंदन केले. 

ग्रॅंट ब्राऊनकडून जर्सी भेट 
पृथ्वीराज इंग्लंड येथील एफ.सी.व्ही. या फुटबॉल ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून, या ऍकॅडमीच्या संघाचे कर्णधारपद मागील दोन वर्षांपासून भूषवत आहे. दरवर्षी इंग्लंड येथे होणाऱ्या 18 वर्षे वयोगटातील या फुटबॉल लीगमध्ये यंदा चाळीस फुटबॉल संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा इंग्लंडमधील लिंकन शहरात पार पडल्या. एफ.सी.व्ही. या ऍकॅडमीचा संघ व क्‍युपीआर या संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये एफसीव्हीच्या संघाने सहा-दोन अशा फरकाने विजय मिळवला. पृथ्वीराजने स्वत: चार गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. उत्कृष्ट खेळाबद्दल इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ग्रॅंट ब्राऊन याने मानाची जर्सी भेट देत पृथ्वीराजचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT