congress 
मराठवाडा

राज्यात फडणवीस सरकार : लातूर महापालिकेत काँग्रेसमध्ये अस्वस्थता

हरी तुगावकर

लातूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार येईल म्हणून लातूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने फोडाफोडीचे राजकारण केले. पण याला चोवीस तास ही होत नाहीत तोच राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. याचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे सरकार येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. या होऊ घातलेल्या सरकार मध्ये आमदार अमित देशमुख यांना मंत्रीपद मिळेल असे गृहित धरला जात होते. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली तर त्याचा फायदा शहराच्या विकासाला मदत होईल असे समजले जात होते. यातून फोडाफोडीचे राजकारण झाले.

असे होते संख्याबळ

लातूर महापालिकेत भाजपचे ३५ , काँग्रेसचे 33 तर वंचित बहुजन आघाडीचा एक नगरसेवक आहे. यात काँग्रेसचे सचिन मस्के हे न्यायालयीन तारीख असल्याने ते अनुपस्थित होते. तर भाजपचे शिवकुमार गवळी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 35 तर काँग्रेसचे 32 असे  होते.

महापौरपदी विक्रांत गोजमगुंडे

शुक्रवारी महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे  दोन मते फोडत महापौरपद मिळवले. तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांना काँग्रेसनेच बसवले. मोठा जल्लोष करण्यात आला. भाजपकडून सत्ता खेचून आणल्याचा आनंद व्यक्त करून चोवीस तास ही होत नाहीत तोच राज्यात राजकीय भूकंप झाला. राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले.

काँग्रेसमध्ये अस्वस्थता

त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. आता पुढे काय होणार याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे. राज्यात एक आणि महापालिकेत वेगळ्या पक्षाची सत्ता राहणार असल्याने विकास कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

मुलगा झाला रे! विकी कौशल आणि कतरिनाला पुत्ररत्न, सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हणाले..

Latest Marathi News Live Update :मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील- मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

HF Deluxe 100cc : येणार CD 100ची आठवण! हिरोने आणली स्वस्तात मस्त बाईक; फीचर्स एकदम दमदार, डिस्काउंट ऑफर्ससह EMI फक्त 799

ठरलं तर मग! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार 'या' दिवशी उडणार, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT