पिंपळगांव रेणूकाई : पाऊस पडताच शेतकरी बालगोपाळासह शेतात जाताना. 
मराठवाडा

शेतकरी शेताकडे, हिरव्या स्वप्नाकडे...

प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) -  शेतकरी आता कोरोनाला बाजूला सारून पुन्हा आपल्या हिरव्या स्वप्नाकडे वळत मृग नक्षत्रातल्या पावसाच्या साक्षीने पेरणीस लागला आहे. 

शेतकरीराजाचा आनंदाचा, उत्सवाचा क्षण म्हणजे पेरणी. त्यात कुठलेही विघ्न येवो पण आधी प्राधान्य दिले जाते ते पेरणीला. याच पेरणीला सुरवात झाली आहे ती गुरुवारच्या (ता. ११) पावसाने. यापूर्वीच लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी आपली शेती मशागतीची कामे संपवून टाकली होती. याला जोड मिळाली ती कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या व परत आलेल्या ग्रामवासीयांची व शाळेला सुटी मिळालेल्या बालगोपालांची.

कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले मात्र शेतकरी हा या कोरोनायुद्धातही खंबीरपणे उभा राहून अवघ्या जगाला अन्नपुरवठा करत आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊसमान चांगले राहणार आहे. त्यानुसार यावर्षीचे नियोजन करत शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरवात केली आहे. परिसरात गुरुवारी (ता. ११) रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सकाळीच कृषी सेवा केंद्र गाठत खते, बियाणे खरेदी केले. शेत गाठत कपाशीची पन्नास टक्के, मका दहा टक्के, मिरची नव्वद टक्के पेरणी करून टाकली आहे. यात मिरचीची आधीच ठिबकवर लागवड झाली आहे तर दहा टक्के मक्याच्या धूळपेरणीचाही समावेश आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात एकूण क्षेत्रापैकी एक लाख तीन हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखालील असून त्यात चाळीस टक्के क्षेत्र हे कपाशीसाठी असते. यावर्षी कपाशीला मिळालेला अल्प भाव, रोगराई आदींचा विचार करता कपाशीचे क्षेत्र घटण्याची शक्‍यता होती, मात्र शेतकऱ्यांनी कपाशीचे क्षेत्र कायम ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मक्याची गेल्या वर्षी अतिवृष्टीने कोंब येऊन झालेली राखरांगोळी तर रब्बी लागवडीत सुकलेल्या मक्याची मोडतोड, अळीचा प्रादुर्भाव व मिळालेला अल्प भाव यामुळे मका लागवड घटण्याची शक्‍यता आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता दिसत आहे. यात द्विदल धान्याचे प्रमाणही वाढण्याची शक्‍यता जाणकार शेतकरीवर्गातून वर्तवली जात आहे. 

भोकरदन तालुक्‍यात एकूण क्षेत्रापैकी लागवड, पेरणीचे क्षेत्र कपाशी ४१ हजार ८०० हेक्टर, सोयाबीन २३ हजार ४५०, मका १८ हजार ३००, मिरची १० हजार २००, द्विदल धान्य ६ हजार ४००, भाजीपाला ८५०, इतर २ हजार हेक्टर असे राहील. 

गेल्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात होता. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी लागवडीमध्ये पाण्याचा भरमसाट उपसा केला. यामुळे चांगला पाऊस असूनही पाणीटंचाई जाणवली. यामुळे दरवर्षी होणाऱ्या धूळपेरणीचे प्रमाण कमी दिसून तर आलेच शिवाय मे महिन्यामध्ये ठिबकवर होणाऱ्या कपाशी लागवडीचे प्रमाण पाहायला मिळाले नाही. शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावरच म्हणजे जवळपास ६० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यावर पेरणी करणेच योग्य असते. पेरणी करण्यापूर्वी शेत स्वच्छ करावे. यामुळे हुमणीवर नियंत्रण मिळू शकते. शिवाय कृषी सल्ल्याचे मार्गदर्शन घ्यावे. 
- डी. बी. व्यवहारे, कृषी अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT