रामनगर : सोमनाथ शिवारात ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करताना शेतकरी.  
मराठवाडा

शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याकडे पाठ 

भगवान भुतेकर

रामनगर (जि.जालना) - यंदा मृग नक्षत्रात वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरातील कृषी सेवा केंद्र कपाशीच्या विविध वाणांनी सजली आहेत. दरम्यान, अनेकांचा मागच्या वर्षीचा कापूस विक्रीअभावी घरात तसाच पडून असल्याने यंदाच्या खरीप हंगामात कपाशीऐवजी सोयाबीन पेरणीला शेतकरी अधिक प्राधान्य देत आहेत. 

दरवर्षी परिसरात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असते. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी जास्त पावसाच्या आशेवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार करण्यात आलेल्या कपाशीच्या महागडे बियाणांची लागवड केली होती. उत्पन्नही चांगले आले होते. मात्र ऐन कापूस वेचणीच्या हंगामात परतीच्या पावसाने तोंडचा घास हिरावला. शेतकऱ्यांनी कसेबसे हाती आलेल्या कापसाला भाववाढीच्या प्रतीक्षेत घरात तसेच साठवून ठेवले.

दरम्यान, यंदा कोरोनाच्या सावटाखाली सीसीआयमार्फत उशिराने ता. २७ एप्रिलपासून सुरू झालेली कापूस खरेदी अजूनही धिम्या गतीनेच सुरू आहे. परिणामी यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पैशाअभावी नाइलाजाने खरीप हंगामाच्या खरेदीसाठी खासगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत. दरवर्षीच्या अशा बिकट परिस्थितीमुळे यंदा खरीप हंगामात कपाशीची लागवड करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही. ज्यांच्याकडे ठिबक सिंचन, वाहतूक व्यवस्थेसह कापूस साठवण्याची जागा मुबलक आहे, असेच सधन शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत. बाकीचे सोयाबीनमध्ये अंतर्गत तुरीचे पीक घेता येत असल्यामुळे सोयाबीनला प्राधान्य देत आहेत.

दरवर्षी कपाशीच्या एका बॅगची वाढती किंमत, त्यातच पुन्हा कीटकनाशकांसह तणनाशक औषधांची फवारणी, खते, खुरपणी, कापूस वेचण्यासाठी मजुरांची वानवा या बाबींचा विचार केला असता उत्पन्नाच्या तुलनेत लागवड खर्च अधिक असल्याने कापसाऐवजी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आदी पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

मागच्या वर्षीचा कापूस विक्री झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. बहुतांश शेतकऱ्यांची मागील वर्षीची खते, बियाणांची उधारी देणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रचालक यंदा उधारीवर बी-बियाणे, खते, औषधे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी यामुळे परिसरातील शेतकरी कमी खर्चात येणारे सोयाबीन व तूर या पिकांना अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 

मागचाच कापूस अजूनही घरात पडून आहे. दरवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांकडून कमी खर्चिक असलेली सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. 
- विष्णू शिंदे 
शेतकरी, सावरगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT