jalna market1.jpg 
मराठवाडा

जालना : रविवारच्या बाजारात शेतकऱ्यांना मनस्ताप, तीनदा उठविले, भाजीपालाही फेकला 

सुहास सदाव्रते

जालना : जुना जालन्यातील रविवार बाजारात शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तीनदा जागा बदलावी लागली तर काहीचा भाजीपाला फेकल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

शहरातील जुना जालना भागात गांधी चमन ते स्टेशन रोड पर्यंत रविवारी बाजार भरतो. मागील दोन आठवडे फारसा बाजार भरला नाही. रविवारी ( ता.२९) शेतकरी भाजीपाला घेवून आले तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बसण्यास मनाई केली. अनेक गावातून आलेले शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला घेवून नगर पालिकेच्या स्टेडियमवर आले. याठिकाणी काही वेळ बसल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथूनही शेतकऱ्यांना हकलून दिले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जामवाडी, वखारी, पोखरी, सिंधी काळेगाव, गोंदेगाव, गोला पांगरी आदी गावातून आलेल्या शेतकऱ्यांना नाहक पालिका कर्मचाऱ्यांचा मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही सकाळी भाजीपाला घेवून आलो तर आम्हाला बसू दिले नाही. तीन ठिकाणी बसून भाजीपाला विकला. नगर पालिकेच्या साहेबांनी आमचा भाजीपाला उचलून फेकला असल्याचे रामनगर येथील शेतकरी गणेश जाधव यांनी सांगितले.

रविवारच्या बाजारात शेतकऱ्यांना दिवसभर मनस्ताप सहन करीत भाजीपाला विकावा लागला असल्याचे विशाल खैरे यांनी सांगितले. नगर पालिका प्रशासन आणि गुत्तेदार यांच्यातील वादामुळे रविवार बाजार सुरळित भरला नाही. यामुळेच शेतकरी वर्ग हैराण झाला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक शेतकरी दिवसभर हैराण झाल्याने अनेकांनी हरिओमनगरात आपले दुकान मांडत भाजीपाला विकला.

नेहमीसारखेच आम्ही भाजीपाला घेवून आलो पण आम्हाला तीनदा हाकलून दिले. काही लोकांचा भाजीपालाही फेकून दिला होता. -संतोष खैरे, शेतकरी, वखारी 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT