आत्महत्या.jpg 
मराठवाडा

मुलाने गळफास घेतल्यानंतर वडिलानेही संपविले आयुष्य! वैजापूरातील घटना

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (औरंगाबाद) : मुलाने गळफास घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वडिलांनी विषारी औषध पिऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील कागोनी शिवारात बुधवारी व गुरुवारी रात्री घडली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  गोयगाव येथील सुरेश कैलास मोटे (वय २२) व कैलास अप्पासाहेब मोटे (५५) या बाप-लेकाचे घरगुती कारणावरून दोन ते तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. यानंतर मुलगा सुरेश घरातून रागाने निघून गेला. गुरुवारी गट क्र. ४० येथील तलावाजवळ झाडाला गळफास लावून सुरेशने आत्महत्या केल्याचे उघड झाले. मुलाचा गुरुवारी रात्री अंत्यविधी झाल्यावर वडील कैलास मोटे हे घरातून बेपत्ता होते.

शिवारातील एका विहिरीजवळ त्यांच्या मोटारसायकलजवळ औषधांचा डबा आणि चपला आढळल्या. त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगत होता. यावेळी वांजरगाव येथील सुरेश लहिरे, सुभाष लहिरे व कागोनीचे पोलिस पाटील मच्छिंद्र धनाड व ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी उशिरा कैलास मोटे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावरून घरगुती कारणावरून दोघांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समजले. मुलगा व पाठोपाठ वडिलांनीही जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT