Railway Boggie Factory Latur 
मराठवाडा

मराठवाडा रेल्वे बोगी फॅक्टरीत पहिला कोच तयार, रेल्वेमंत्र्यांकडून कौतूक

विकास गाढवे

लातूर : देशातील चौथ्या व महाराष्ट्रातील पहिल्या येथील रेल्वे बोगी (कोच) कारखान्यातून शुक्रवारी (ता. २५) पहिल्या कोच शेलची निर्मिती पूर्ण झाली. हा कोच शेल तयार करून सुशासन दिनी रेल्वेने पहिले पाऊल टाकत प्रत्यक्ष निर्मितीला सुरवात केली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याची माहिती देत महाराष्ट्रातील या अत्याधुनिक कारखान्यातून मोठ्या संख्येने रोजगार मिळेल व लातूर भागात एक औद्योगिक परिसंस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यानिमित्त रेल्वेने ‘मेक इन इंडिया’ला वेगळी उंची मिळवून दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


अडीच वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने अतिरिक्त एमआयडीसी परिसरात प्रकल्पाच्या उभारणीला सुरवात झाली. रेल्वेमंत्री गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला. प्रकल्पाचे नामकरण मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरी होऊन टप्प्याटप्प्याने कारखान्यात रेल्वेकोच निर्मितीच्या सुविधा तयार झाल्या.

डिसेंबरमध्ये कारखान्यात प्रकल्प कोच निर्मितीला सुरवात होणार असल्याने अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी अर्थात सुशासन दिनी या प्रकल्पाचा आभासी (ऑनलाइन) लोकार्पण सोहळा घेण्याची मागणी आमदार पवार यांनी गोयल यांच्याकडे केली होती. त्यास गोयल यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे पवार यांनी अडीच महिन्यापूर्वी सांगितले होते. यामुळेच कोच निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, कोरोनामुळे लोकार्पण सोहळ्याची अनिश्चितता होती. यातच प्रकल्पात शुक्रवारी पहिला कोच सेल तयार करून रेल्वेने सर्वांना सुखद धक्का दिला.



औद्योगिक विकासाला चालना
कारखान्याच्या भूमिपूजन प्रसंगीच डिसेंबर २०२० अखेर या प्रकल्पातून प्रत्यक्षात रेल्वेकोच उत्पादनास सुरवात होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कारखान्यामुळे मराठवाड्यातील पन्नास हजारहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रकल्पाची उभारणी वेगाने होऊन जाहीर केलेल्या मुदतीत उत्पादनाला सुरवात झाली. प्रत्यक्षात कोच उत्पादनाचा मार्ग मोकळा होऊन आत्मनिर्भर भारत अभियानाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार असल्याचे आमदार निलंगेकर यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate case: माणिकराव कोकाटेंना अद्याप अटक नाही, मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी काय सांगितलं?

Pune News : पेशवे सृष्टीचे काम रखडले; पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

Prakash Shinde: ड्रग्ज प्रकरणातून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न: प्रकाश शिंदे; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

SCROLL FOR NEXT