rajesh tope.jpg 
मराठवाडा

कोरोनायोद्धे डॉक्टर अन् पोलिसांना कोरोनाची पहिली लस : आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

उमेश वाघमारे

जालना : कोरोनाची लस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पोलिस व पन्नास वर्षांपुढील ज्यांना विविध आजार आहे अशा रुग्णांना देण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मंगळवारी (ता.एक) जालना येथे दिली. पदवीधर निवडणुकीसाठी मतदान हक्क बजावल्यानंतर श्री. टोपे हे पत्रकारांशी बोलत होते. 

यावेळी आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, कोरोनावरील लस लवकर यावी यासाठी देशातील पाच कंपन्यांकडून काम सुरू आहे. लस आल्यानंतर ती देण्यासाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना येत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पोलिस, 50 वर्षांपुढील कोमॉर्बिड रूग्ण व त्यानंतर जेष्ठ नागरिकांना क्रमवारीने माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. या क्रमवारीनुसार कोरोनाची लस देण्याची केंद्र शासनाची मनिषा दिसून येत असून त्यांच्या निर्देशानुसार कोरोना लसीकरणाची कारवाई केली जाणार आहे.

कोरोनाच्या लसीकरणावर केंद्र व राज्य शासनाचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणेच कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हणाले तरी प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्प्यानुसारच कोरोनाची लस दिली जाईल. मात्र, कोरोनाची लस नेमकी कधी येईल याची आज तारीख सांगता येणार नाही. मात्र, कोरोनाची लस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात लसीकरण कसे करता येईल याची माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.  

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT