Marathwada Beed News 
मराठवाडा

गेवराई : सातबारा देण्यासाठी तलाठ्याने घेतली २२० रुपयांची लाच

सकाळवृत्तसेवा

गेवराई : गेवराई : जमिनीचा सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून २२० रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शहरातील ताकडगाव रस्त्यावर असलेल्या रूची भोजनालया मध्ये सोमवार(ता.आठ)  रात्री ही कारवाई करण्यात आली. दादासाहेब सुखदेव आंधळे (वय ३४) असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. 

औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   
जमिनीचा सात बारा व आठ अ चा उतारा देण्यासाठी तलाठी दादासाहेब सुखदेव आंधळे (वय ३४) यांनी पैशाची मागणी केली होती. आंधळे हे खळेगाव सज्जाचे तलाठी आहेत. तक्रारदार कैलास नारायणराव ढोले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात 

गेवराई येथील महसूल प्रशासन सध्या भ्रष्टाचाराने गाजले आहे. नुकत्याच झालेल्या रेशन घोटाळ्यात गोदामपाल संजय राजपूत यास अटक करून निलंबित करण्यात आले होते. पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार अशोक भंडारी यास घोटाळाप्रकरणी जेरबंद करण्यात आले होते.

काही दिवसापूर्वी वाळू तस्करीच्या प्रकरणात लाच घेताना नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे यांना रंगेहात पकडले होते. एकंदरीत गेवराईचे महसूल प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT