ऊस चाकूर.jpg 
मराठवाडा

चाकूरात वादळी पाऊस : घरणी प्रकल्प भरला; ऊसही झोपला, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! 

प्रशांत शेटे

चाकूर (लातूर) : तालूक्यात मंगळवारी (ता.१३) रात्री पासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतातील उस आडवे पडले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चाकूर व शिरूर अनंतपाळ तालूक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणारा घरणी मध्यमप्रकल्प पुर्णता भरला आहे. 

तालूक्यात सर्वत्र मंगळवारी रात्री पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे उभा उस आडवा पडला असल्यामुळे झरी (बु), राचन्नावाडी, शेळगाव या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. पावसाच्या 
अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून ढिग लावले आहेत. वाऱ्यामुळे सोयाबीनच्या ढिगावरील ताडपत्री उडून गेल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. 

बुधवारी (ता.१४) सकाळ पर्यंत झालेला मंडळ निहाय पाऊस :

 चाकुर- ७२ मी.मी, नळेगाव ७० मिमी, वडवळ नागनाथ ५० मिमी, झरी बु. २१ मिमी, शेळगाव ५३ मिमी, आष्टा ५७ मिमी, पाऊस झाला आहे. तालूक्यात आजपर्यंत ८०२ मी.मी पाऊस झाला असून एकुण सरासरीच्या ८६.८९ टक्के पाऊस झाला आहे. यापावसामुळे नदी नाल्यातून पाणी वाहू लागल्यामुळे तलावातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. विविध गावांना पाणी पुरवठा करणारे घरणी मध्यम प्रकल्प, संगाचीवाडी, बोथी, राचन्नावाडी या तलावात पाणी पातळीत वाढ होत असून घरणी मध्यम प्रकल्प पुर्णता भरला आहे. 

सतर्कतेचा इशारा

पावसामुळे तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उस आडवा पडला असून पुढील तीन दिवस होणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT