जानला.jpg 
मराठवाडा

तेरवीचा खर्च टाळून स्वाध्याय पुस्तिकांची दिली भेट

सुहास सदाव्रते

जालना : नेर ( ता. जालना) येथील  केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी दादाराव काशिनाथ कुरेवाड यांनी प्राथमिक शाळेतील २१६ विद्यार्थ्यांना  अभ्यासासाठी स्वाध्याय पुस्तिका भेट दिल्या आहेत. तेरवीचा खर्चाला फाटा देत मुलांसाठी हा निधी दिल्याने उपक्रमाचा आदर्श उभा राहिला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शाळा बंद आहेत. 

यातच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक आपआपल्या पद्धतीने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. यातच नेर (ता.जालना) येथील दादाराव कुरेवाड यांनी त्यांच्या मातोश्री (स्व.) निलाबाई काशिनाथ कुरेवाड यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत संपूर्ण खर्च त्यांनी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वाटप करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. यापुढेही समाजाने असा विनाकारण होणारा खर्च टाळून सामाजिक व शैक्षणिक कार्यात हातभार लावावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. या वेळी नेर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी बाबूराव पवार यांनी कुरेवाड परिवाराने केलेल्या आदर्श कामाबद्दल कौतुक केले. यावेळी नेरचे सरपंच बेबीताई दाऊदखाँ पठाण, शालेय समिती अध्यक्ष निलेश मासटवाड, दादाराव कुरेवाड, दीपक कुकटकर, भास्कर कुलवंत, प्रताप पाईकराव, विलास खरात, मुख्याध्यापक विजय पितळे यांच्यासह सर्व सहशिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय पितळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण नागरे यांनी दादाराव कुरेवाड व उपस्थितांचे आभार मानले.

(Edited By Pratap Awachar)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जन मिरवणुकांमध्ये जिवंत देखावा; आई तुळजाभवानीचं साजिरं रूप पाहून भाविक भारावले, Video पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

SCROLL FOR NEXT