Good News: Chance to Job for Fifty Thousand Aurangabad News 
मराठवाडा

खूशखबर... ५० हजार तरुणांना रोजगाराच्या संधी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: महापालिकेने परवानगी दिल्यानंतर चिकलठाणा व रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील कंपन्या सुरू झाल्या आहेत. आधीच्या वाळूज, शेंद्रा एमआयडीसीप्रमाणेच चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसीही आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही एमआयडीसीमधील बरेच लघुउद्योग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत, अशी माहिती मासिआचे उपाध्यक्ष अभय हंचनाळ यांनी दिली. दरम्यान, या कंपन्यांमध्ये आधी काम करणारे परप्रांतीय मजूर गावाकडे गेले आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना ५० हजारांवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

 चिकलठाणा व रेल्वेस्टेशन एमआयडीसी महापालिका हद्दीत येतात. शहर ‘रेड झोन’मध्ये असल्याने त्यांना परवानगी मिळत नव्हती. उद्योग संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर परवानगी मिळाली. प्रत्येक कंपनीत ३० ते ४० टक्के कामगार उपस्थित राहत आहेत.

येत्या काही दिवसांतच कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न उद्योजकांचा आहे. असे असले तरी उद्योजकांना मनी, मॅनपावर आणि मार्केट या तीन ‘एम’वर काम करावे लागणार आहे. आर्थिक योजनांचा लाभ लघू आणि सूक्ष्म लघुउद्योजकांना मिळवून देण्यासाठी संघटनेकडूनही प्रयत्न केल्या जातील. बँका आणि उद्योजक यांच्यात समन्वयक म्हणून ‘मासिआ’ काम करेल, असेही श्री. हंचनाळ यांनी सांगितले. 

बहुतांश उद्योग हे बाजारपेठांवरच अवलंबून असतात. पुढील काही दिवस जुन्या मिळालेल्या ऑर्डरवर काम करता येईल; मात्र अर्थचक्र सुरळीत चालण्यासाठी बाजारपेठा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे, तरच रोजगार टिकून राहील, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे. 

हेही वाचा : VIDEO : हर्षवर्धन जाधव यांची दानवेंना आत्महत्येची धमकी, केले गंभीर आरोप
सधींचा लाभ घ्या ः हंचनाळ 
शहर व जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये अडीच लाखांपेक्षा अधिक स्थलांतरित मजूर काम करीत होते. आता बरेचसे मजूर गावी परतले आहेत. यामुळे आजघडीला सर्व एमआयडीसींमध्ये जवळपास ५० हजार नवीन रोजगार निर्माण झाला आहे. स्थानिक तरुणाईला ही मोठी संधी आहे. या संधीचा लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे, असे मत मासिआचे उपाध्यक्ष अभय हंचनाळ यांनी मांडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT