Gramshevak.jpeg 
मराठवाडा

राष्ट्रीय आपत्तीत ‘यांचे’ही काम मोलाचे

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : राज्यभरातील ग्रामसेवक कर्तव्य सूचीनुसार ग्रामपातळीवर अतिशय संवेदनशीलपणे काम करीत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनात राज्यातील ग्रामसेवकांचे कार्य मोलाचे आहे, असे कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष नितीन धामणे व सचिव हरिश्चंद्र काळे यांनी व्यक्त केले. 

मागीलवर्षीही केले आपत्तीत काम
मागीलवर्षी कृषि पदवीधर ग्रामसेवकांनी राष्ट्रीय काम समजून प्रधानमंत्री किसान योजना, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे, पिक विमा करिता पिक कापणी प्रयोग, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारित बायोगॅस निर्मिती व सयंत्र उभारणे, लोक जैविक विविधता नोंदवह्या इत्यादी कामे प्रभावीपणे केले आहे. 

योद्ध्याप्रमाणे कामाची तत्परता
जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूचे संकट आपल्या राज्यात व मोठ्या शहरात सुरु झाले. पर्यायाने त्याची दाहकता ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहचल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, लक्षणे, उपाययोजना बाबत सर्वत्र पसरलेले गैरसमज व या सर्व बाबींवर समयसूचकता दाखवत योग्य उपाययोजनेसह सामोरे जाण्याचा प्रसंग ग्रामीण भागासाठी अतिशय कठीण होता. या कठीण प्रसंगात सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी स्वतःचा जीव घोक्यात घालून एका योद्ध्याप्रमाणे सर्वच पातळीवर काम करीत आहेत. 

गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु
ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु ठेवून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनात निवरणात महत्वाची भूमिका ग्रामसेवक संवर्ग निभावत असून गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा या कामाबरोबरच मुंबई, पुणे व इतर शहर व इतर राज्यातून आलेल्या नागरिकांच्या बारकाईने नोंदी घेऊन आरोग्य विभागाच्या सहकार्याने स्थलांतरीत नागरिकांना गावातच होम क्वारंनटाईन करणे, त्यांचेवर लक्ष ठेवणे, गावातील सर्व नागरिकांना मास्क व सॅनीटायझर चे वाटप करणे तसेच इतर पॅरामेडिकल सुविधा पुरविणे, गरीब, गरजू निराधार, अपंग नागरिकांना संचारबंदीच्या काळात रेशन पुरवठा करणे, तयार अन्नाचे पाकिटे पुरविणे, संशयित कोरोना रुग्णांना क्वारंनटाईन निवारा उभारणे, गावात जंतुनाशकाची फवारणी करणे, कोरोना नियत्रण प्रचार करणे, भिंती पत्रके लावणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, जिल्हा सीमा चेक पोस्टवर पोलीस यांचे सोबत काम करणे इत्यादी कामे पार पाडतांना यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका फार महत्वाची व वेगळ्या पद्धतीने दिसून आली आहे. 

ग्रामिण भागात कोरोनाचा शिरकाव नाही
शैक्षणिक कृषि विषयक ज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे व इतर शेतमाल यांचे नुकसान होऊ न देता प्रत्यक्षपणे शेतकरी उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. तसेच शासनाच्या सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करणे व कोरोनाचा प्रतिबंध करणेस प्रमुख भूमिका बजावली आहे. सर्व बाबी सर्वजण राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन कुठल्याही प्रकारचे कोरोना विषाणू नियंत्रण बाबतचे प्रशिक्षण व साहित्य मिळालेले नसताना सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत त्यामुळेच आजपर्यंत ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव अद्याप झालेला नाही. 

- शिवकुमार देशमुख, 
राज्य प्रसिद्धीप्रमुख, कृषि पदवीधर तांत्रीक ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VVMC Election: मनसे-बविआ युतीमुळे गणित बदललं; उद्धव ठाकरे एकटेच लढणार? ११५ जागांची लढाई रंगणार

Shocking : क्रिकेटच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षकाचा मृत्यू; खेळाडू मैदानावर उतरणारच होते, तितक्यात घडला धक्कादायक प्रकार

BMC Election: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची बीएमसी निवडणुकीत एन्ट्री? दोन्ही मुलींकडून वडिलांसोबत अर्ज दाखल; कोणत्या जागेवरून लढणार?

Marathi Weekly Tarot Horoscope: लक्ष्मी योगामुळे वृषभ, मिथुन, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ; वाचा साप्ताहिक टॅरो राशिभविष्य

Stock Market Holiday : NSE कडून 2026 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर; 15 दिवस शेअर बाजार बंद! 1 जानेवारीला बाजार सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT