file photo 
मराठवाडा

अनैतिक संबंध ठेवू देत नव्हता, झोपेच्या गोळ्या देऊन नवऱ्याला जाळून...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अनैतीक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काटा काढला. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन त्याला जीवंत पेटवून निर्घृण खून करणाऱ्या पत्नीविरुद्ध देगलुर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देगलूरच्या शिवबानगर भागात बुधवारी (ता. १९) रात्री घडली. 

देगलूर शहराच्या शिवबानगर येथे यलप्पा लक्ष्मण देगलुरकर (वय ३०) हा आपल्या पत्नीसोबत राहत असे. यलप्पा हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून या दोघांचे नेहमी वाद होत असत. या दरम्यान पत्नीचे अनैतीक संबंध उजागर झाल्याने त्याने तिला अनेकवेळा समजावून सांगितले. परंतु तिच्या वागण्यात काही साधारणा होत नव्हती. यामुळे यांच्यात नेहमी वाद उफाळून येत असे.

पतीला जीवंत जाळले

आपल्या अनैतीक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय त्याच्या पत्नीने घेतला. मंगळवारी (ता. १७) सकाळी ११ ते बुधवारी (ता. १९) सायंकाळी सहापर्यंतच्या काळात तीने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या जेवणातून दिल्या. नशा चढल्याने तो झोपी गेला. यावेळी त्याच्या अंगावर रॉकेल टाकून तीने जीवंत जाळून ठार केले.

परंतु ही बाब त्याने नशेत जाळून घेतल्याचे सुरवातीला पोलिसांना सांगितले. मात्र या दोघांचा नेहमी वाद होत असल्याचे मुख्य कारण उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांनी शोधले. तिला ताब्यात घेऊन त्यांनी विचारपूस केली असता त्याचा गळा आवळून खून करून नंतर त्याला स्वत: पेटवून मारल्याची कबुली दिली.
 
देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा 

या प्रकरणात हिंगोली येथील शासिकय रुग्णालयात कक्षसेवक म्हणून कार्यरत असलेले मयताचे वडील लक्ष्मण देगलुरकर यांच्या फिर्यादीवरून देगुलर पोलिस ठाण्यात पत्नी ज्योती यलप्पा देगलुरकर (वय २७) हिच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे, देगलुरचे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी भेट दिली. देगलूर पोलिसांनी आरोपी ज्योती देगलूरकर हिला न्यायालयासमोर हजर केले असता तिला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. या घटनेमुळे देगलुर शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर मोठा पेच होता. परंतु काही आजूबाजुच्या लोकांना विश्‍वासात घेऊन विचारणा केली. यावेळी अनैतीक संबंधातून या पती पत्नीचा वाद होत असे हे मुळ पोलिसांना समजताच मयताच्या पत्नीला ताब्यात घेतले. तिने प्रथम पोलिसांना मामा बणविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या नजरेतून तिचा गुन्हा सुटला नाही. शेवटी तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.  
- रमेश सरवदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, देगलूर, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT