Parbhani Crime News esakal
मराठवाडा

सेलूत धक्कादायक घटना ! पतीने केली आत्महत्या, पत्नीचाही मृत्यू

अर्जुनचा तीन वर्षांपूर्वीच प्रियंकाशी विवाह झाला होता.

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : शहरातील राजीव गांधी नगरात गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली, तर पत्नीचा पलंगावर मृतदेह आढळून आला आहे. ही घटना सोमवारी (ता.२८) सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सेलू (Selu) शहरातून राजीव गांधी नगरातील अर्जुन गणेश आवटे (वय ३२ ) याने लोखंडी पत्राच्या आडूला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पत्नी प्रियंका (वय २८) हिचा मृतदेह पलंगावर आढळून आला. आवटे पती पत्नी एका खोलीत रविवारी राहत्या घरी झोपले होते. (Husband Committed Suicide, Wife Dead Body Found In Selu Of Parbhani)

सोमवारी सकाळी ७ वाजले तरी दोघेही झोपेतून उठले नसल्याने अर्जुन यांच्या बहिणीने रूमची कडी वाजवली तरी ते बाहेर आले नाहीत. अर्जुनच्या बहिणीने तिच्या वडीलांना माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. अर्जुनचा तीन वर्षांपूर्वीच प्रियंकाशी विवाह झाला होता. तो शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवत होता. (Parbhani)

घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला असून तपास सुरु आहे. तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे गाडेवाड यांनी सांगितले. प्रियंकाचा मुत्यू कसा झाला याचा तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंड्याभाऊ हरपले ! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन; मराठी सिनेविश्वावर शोककळा

Fadnavis Reaction on Jarange Hunger Strike: मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले..

सरोगसी करण्यासाठी किती खर्च येतो? सनी लिओनी म्हणाली- आम्ही त्या मुलीला इतके पैसे दिलेले की तिने...

Cyber Crime: गणेशोत्सवात सायबर भामट्यांचे जाळे! घरपोच प्रसाद, व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन

Latest Maharashtra News Updates : बोरिवली पश्चिमेतील दत्तानी टॉवरमधील फ्लॅटला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT