file photo 
मराठवाडा

नांदेडात हायप्रोफाईल मटका अड्डा उद्धवस्त 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील होळी परिसरात एका चार मजली इमारतीत चालणारा हायप्रोफाईल मटका अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. यावेळी विविध राज्यातील २५ दलालांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल आणि ‘मधुर’ नावाच्या मटक्याचे साहित्य असा एक लाखाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई स्थआनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी बुधवारी (ता. २९) रात्री केली. 

नांदेड शहर व जिल्ह्यात मटका, जुगारासह आदी अवैध धंदे चालु देणार नाही असा पावित्रा पोलिस  अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घेतला आहे. तशा सक्त सुचना त्यांनी ठाणेदारांना दिल्या आहेत. एवढेच नाही तर मटका व जुगारावर आळा बसावा म्हणून त्यांनी मटका माफियांना सळोकीपळो करुन सोडले. तर काही जणांवर मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल केले. सध्या शहरातील काही मात्तबर मटका माफिया आपल्या जागा बाहेर राज्यातील मटका माफियांना देत असल्याचे हे धक्कादायक घटना बुधवारच्या कारवाईवरून दिसून येते. जुन्या नांदेड, व देगलूर नाका भागातील अनेक मटका माफिया उजळ माथ्याने फिरत असतांना पोलिस त्यांना पाठिशी घालीत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र मटका माफिया या जिल्ह्यात मी असेपर्यंत राहू देणार नाही अशी वज्रमुठ श्री. मगर यांनी बांधली आहे. 
जुन्या नांदेड परिसरात असलेल्या कुंभारटेकडी येथील मॉ किसना या इमारतीतील चौथ्या मजल्यावर मटका अड्डा सुरू असल्याची माहिती श्री. मगर यांना मिळाली. 

एक लाखाचा मुद्देमाल जप्त

यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सांगितले. श्री. चिखलीकर यांनी पोलिस अक्षीक श्री. मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: लक्ष घालून आपल्‍या काही विश्‍वासु कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी कुंभारटेकडी गाठली. ज्या ठिकाणी हा अड्डा चालतो तिथेपर्यंत कुठलेच वाहन जात नाही. अतिशय गोपनियतेने या इमरतीला घेरून छापा टाकला. यावेळी त्यांनी गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा, उत्तराखंड, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अशा २५ मटका दलालाना अटक केली. त्यांच्याकडून एक लॅबटॉप, ३५ मोबाईल, एक झेरॉक्स प्रिंटर आणि नगदी असा एक लाख ५३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

नागपूरचा महेंद्र शर्मा अटक

नागपूर येथील महेंद्र शर्मा या मुख्य व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. तो विविध राज्यातील आपल्या दलालांना सोबत घेऊन मधूर नावाचा मटका चालवित होता. श्री. मांजरमकर यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात २५ मटका दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मांजरमकर, फौजदार प्रविण राठोड आणि अन्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सर्वांचे पोलिस अधिक्षकांनी कौतुक केले.

हे आहेत मटका दलाल (आरोपी)

महेंद्र शर्मा नागपूर, सुनिल बडगरे, अमरावती, अनिरुद्धसिंह राठौर, कृपालसिंह वाघेला, दलपतीसिंग जाडेजा, जयद्रसिंह सोधा, किरीट जडेज, नितीन लालन सर्व राहणार गुजरात, लिलाधर डेढीया रा. मुंबई, शिवराजसिंह अधिकारी उत्तराखंड, भरत आर्य मुंबई, गणेश गणोरकर बुलढाणा, निहाल बोडस यवतमाळ, अजय शर्मा अकोला, संतोष शर्मा नागपूर, कमलेश पराते चंद्रपूर, राजेंद्र बहीर बीड, तुषार कस्तुरे नागपूर, अनुप बडगरे नागपूर, दीपक भट वाशिम, जय महाराणा ओरिसा, दीपक उपाध्याय आंध्रप्रदेश, ललीतकुमार आयतवार यवतमाळ, धर्मेश बागडी नागपूर, दिलीप गिरटकर उमरेड, नागपूर, रुपेश गौड हिंगोली आणि मॉ किसना निवासमधील मटका सुरु होता त्या घराचा मालक.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancard Update : एक चूक अन् 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड होईल बंद..आत्ताच करून घ्या 'हे' एक काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Pune News: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, भरधाव वेगामुळे अपघात; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळील घटनेबाबत पोलिसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT