hingoli photo
hingoli photo 
मराठवाडा

गावात आलेल्यांची माहिती लपवणे सरपंचाला पडले महागात...कसे वाचा

जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्‍यातील जांभरून रोडगे येथील सरपंचांनी पर जिल्ह्यातून आलेल्या आठ नागरिकांची माहिती अंधारात ठेवली. त्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर प्रशासनाची एकच धांदल उडाली. त्यामुळे संबंधित सरपंचांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी गुरुवारी (ता.३०) दिले आहेत.

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची गाव पातळीवर अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने परराज्य व इतर जिल्ह्यातून गाव पातळीवर येणाऱ्या लोकांकडे बारकाईने लक्ष देऊन त्याबाबतची माहिती तहसील कार्यालय व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ सादर करणे गरजेचे आहे. 

येलदरी येथून आणले वाहनाने 

त्या लोकांना क्वॉरंटाइन करणे ही बाब ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव ग्रामसेवक यांची आहे. मात्र तालुक्यातील जांभरून रोडगे येथे (ता.२०) एप्रिल रोजी सरपंचांनी स्वतः आठ लोकांना येलदरी येथून वाहनाने गावात आणल्याची घटना घडली होती. 

एकजण निघाला पॉझिटिव्ह

सदरील माहिती प्रशासनाला दिली नाही. त्या लोकांना तत्काळ क्वॉरंटाइन करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. सदरील बाब शासनापासून लपवून ठेवून प्रशासनाला अंधारात ठेवले. सरपंचांनी आणलेल्या आठ लोकांपैकी एक जण पॉझिटिव्ह निघाला. संबंधित रुग्ण बारा लोकांच्या संपर्कात आला. 

प्रशासनाची धावपळ

त्यामुळे प्रशासनाला खबरदारी म्हणून जांभरुन रोडगे गावच्या आसपास असलेली गावे सील करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. ऐनवेळी प्रशासनाला मोठी धावपळ करत संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रशासनाचा वेळ गेला व आर्थिक झळ सोसावी लागली. 

गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सदरील घटनेची गंभीर दखल तहसील प्रशासनाने घेतली असून जांभरुन रोडगे येथील सरपंचावर आपत्ती व्यवस्थापन तरतुदीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

गैरसोयीला सामोरे जावे लागले

गाव पातळीवर परराज्य किंवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तत्काळ माहिती प्रशासन व आरोग्य विभागाला देणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांची आहे. जाभरुन रोडगे येथील सरपंचांनी इतर जिल्ह्यातून आलेल्या आठ लोकांची माहिती शासनापासून लपवून ठेवल्यामुळे प्रशासनाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन तरतुदीच्या अनुषंगाने सरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंचायत समितीला दिले आहेत.
- जीवककुमार कांबळे, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलील ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT