corona death.jpg 
मराठवाडा

Corona Update : जालन्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, आठ रुग्णांची भर

उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता.१०) दोन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून नव्याने आठ बाधित रूग्णांची भर पडली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ५१५ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत ३७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात शुक्रवारी (ता.दहा) दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाने गुरूवारपर्यंत २३२ नमुने कोरोना चाचणीसाठी औरंगाबाद येथे पाठवले आहेत. त्या पैकी १४ नमुन्यांची कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी (ता.१०) सकाळी प्राप्त झाला आहे. यात आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर २१८ नमुने प्रलंबित असून सायंकाळीपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होतील. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अजून भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ३०८ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपादन : प्रताप अवचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT