Jalna News 
मराठवाडा

Corona Update : जालन्यात तब्बल चाळीस जण पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा आता सहाशे पार 

महेश गायकवाड

जालना : जालना शहरात रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. बुधवारी (ता.एक) शहरातील तीन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात गुरुवारी (ता.दोन) सकाळी तब्बल चाळीस संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा आता सहाशे पार झाला आहे.

मंगळवारी सकाळी सलग दोन आणि बुधवारी तीन अशा पाच कोरोना बाधित रुग्णांचा दोन दिवसात मृत्यू झाल्याने बळींची संख्या अठरा झाली. तर सातत्याने भर पडत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे एकुण बाधितांचा आकडा ६२१ झाला आहे. 
कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १५६ संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात तब्बल चाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. बाधित रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील आहे.

जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा आता ६२१ झाला आहे. त्यापैकी ३६० रूग्ण बरे झाले आहे. तर अठरा रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या कोविड हॉस्‍पीटलमध्ये २४३ रूग्णांवर उपचार सुरू आहे. सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये घनसांवगी शहरातील दोन तर उर्वरित ३८ रूग्ण हे जालना शहरातील विविध भागातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

जालना कोरोना मिटर
एकुण बाधित ६२१
उपचार सुरू २४३
बरे झाले ३६० 
मृत्यू १८
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra farmer loan waiver : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा, काय आहेत नियम ? अहिल्यादेवी होळकरांचे दिले नाव

वाढवण बनेल ‘चौथी मुंबई’, १,२०० किमी मेट्रो, ६,००० किमीचा एक्सप्रेसवे अन्...; अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठा मास्टरप्लॅन, तरतुदी काय?

Maharashtra Budget 2026 : लाडक्या बहिणींचे २१०० रुपयांचे स्वप्न भंगले! वाढीव निधीच नाहीच, महायुती सरकारचा यू-टर्न; अर्थसंकल्पात मोठी निराशा

IND vs NZ Final Rule : ... तर भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद दिले जाणार! T20 World Cup फायनलसाठी ICC चा नियम घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT