no cash.jpg 
मराठवाडा

निधी परतला कामे खोळंबली; कळंबमधील शिक्षण, आरोग्य विभागाला घरघर !  

दिलीप गंभीरे

कळंब (लातूर) : शासनाने नीती आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला शाळा वर्ग खोली व आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी ११ कोटी रुपयाचा निधी दिला होता. या निधीतून जिल्ह्यातील अनेक गावांतील शाळा वर्गखोल्या, आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आली आहे. कंत्राटदाराने विहित मुदतीत कामे केली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु निधी परत गेल्याने पुन्हा कामे खोळंबली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची लाखो रुपये देयके अडकली आहेत. निधीची ओरड करणाऱ्या शिक्षण व आरोग्य विभागाला अध्याप दमडीही मिळाली नाही. हे विशेष. 

जिल्ह्यातील अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांना गळती लागल्याची ओरड आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे निधीचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य उपकेंद्राची वाताहत झाल्याचे जिल्ह्यातील अनेक गावात पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची संपूर्ण इमारत बांधावयाची असल्यास मोठ्या निधीची आवश्यकता असते. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी मिळाल्यास ही बांधकामे होते.

मात्र, आवश्यक त्या प्रमाणात निधी मिळत नसल्याने आरोग्य तसेच प्राथमिक शाळेच्या इमारतीला बांधण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. २०१९ मध्ये नीती आयोग निधीमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोली बांधकामे, दुरुस्तीसाठी ५ कोटी तर आरोग्य उपकेंद्र व दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आरोग्य विभागाने उपकेंद्र बांधकामासाठी चार कोटी रुपये खर्च केले. शाळेच्या वर्ग खोली बांधकामासाठी शिक्षण विभागाचा एक कोटी रुपये खर्च झाला आहे. शिक्षण व आरोग्य विभागाचा जवळपास ६ कोटी रुपयांचा निधी परत गेल्याने कंत्राटदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. विहित मुदतीत कंत्राटदार यांनी कामे पूर्ण केली असून बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार
मागच्या काही महिन्यात नीती आयोगाचा प्राप्त निधी परत गेला असून याबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात झाली आहे. निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी (प्राथमिक) शिक्षण अधिकारी रामलिंग काळे यांनी सांगितले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT