corona.jpg 
मराठवाडा

Corona Update : लातूरमध्ये चोवीस तासात ६८ पॉझिटिव्हची भर; ५५ जणांनी केली कोरोनावर मात

हरी तुगावकर

लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. यात सोमवारी (ता.२०) ६८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या एक हजार २२७ इतकी झाली आहे. दरम्यान कोरोनावर मात केल्याने ५५ नागरीकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या दोन दिवसातील ४३२ रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दररोज ५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या स्वॅबची तपासणी केली जात आहे. यात सोमवारी (ता.२०) ६८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजार २२७ झाली आहे. यात ६३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर ५३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान सोमवारी ५५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. यात बारा नंबर पाटी येथील वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमधील १६, निलंग्याच्या कोविड केअर सेंटरमधील चार, उदगीरच्या सामान्य रुग्णालयातील चार, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक, उदगीरच्या कोविड केअर सेंटरमधील एक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २६ तर चाकूरच्या तीन रुग्णांचा यात समावेश आहे.

(संपादन प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT