लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना कहर वाढतच चालला आहे. त्यात बुधवारी (ता. नऊ) तर बाधितांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. या एकाच दिवशी ५०२ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना बाबतची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा १० हजार ९७४ वर गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. यात बुधवारी पाच जणांचे मृत्यूचे अहवाल आले. त्यामुळे कोरोनामुळे एकूण मृत्यूचा आकडा आता ३३४ वर पोहचला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यात तर बुधवारी बाधितांच्या संख्येने तर उच्चांक गाठला. मार्चपासून आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
यात जिल्ह्यात २४२ जणांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या होत्या. यात १२२ जण पॉझिटीव्ह आले आहेत .तर एक हजार ४९० रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट झाल्या यात ३८० जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. असे एकूण ५०२ जण बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधिताचा आकडा आता १० हजार ९७४ वर गेला आहे. सध्या दोन ९६२ जणांवर उपचार सुरु आहेत .तर सात हजार ६७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा लातूर जिल्ह्यासाठी चिंताजनक ठरू लागला आहे. यात नागरीकांनी स्वतः च काळजी घेण्याची गरज आहे.
लातूर कोरोना मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.