Latur News 
मराठवाडा

व्वा रे कलेक्टर! वैष्णोदेवीचा प्रसाद घेतला आणि घरमालकाच्या कराचे फाडले बिल

हरी तुगावकर

लातूर : येथील एका व्यक्तीच्या घरी वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आल्याचा आनंद साजरा केला जात होता. याकरिता निमंत्रितांना स्नेहभोजनासाठी बोलावण्यात आले होते. यात जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचाही समावेश होता. त्यांनी प्रसाद तर घेतलाच, पण ज्या ठिकाणी स्नेहभोजन केले त्या इमारतीचा मालमत्ता कर भरणा केल्याची विचारणाही केली.

हा कर भरला गेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी `यजमाना`कडून कराचे तीस हजार रुपये वसुल केले. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः पावती फाडूनही दिली. कलेक्टरच खुद्द बिल कलेक्टर बनल्याचा अनुभव यावेळी उपस्थितांनी घेतला.

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. तीन महिन्यापासून अधिकारी व कर्मचाऱय़ांच्या पगारी नाहीत. गेल्या काही महिन्यापासून मालमत्ता कर व गाळेभाड वाढीच्या संदर्भात तक्रारी आहेत. यात ता. २० फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेने मालमत्ता करात थकबाकीवरील सर्व व्याज माफ करणे तसेच करामध्ये बारा टक्केची सूट देण्याचा निर्णय घेवून लातूरकरांना दिलासा दिला. तसेच गाळेधारकांना रेडिरेकनरच्या दरात ५० टक्के सवलत देण्याचाही निर्णयही घेतला.

येथील महापालिकेचे आयुक्त एम. डी. सिंह यांची दहा दिवसापूर्वी यवतमाळला बदली झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडेच आयुक्तपदाचा पदभार आहे. तीन दिवसापूर्वी महापालिकेने केलेल्या सवलतीच्या ठरावीची प्रत जी. श्रीकांत यांच्याकडे आली. तातडीने त्यांनी आता कराची वसुली करण्याच्या सूचनाही अधिकाऱयांना दिल्या आहेत. महिन्यात साठ कोटीची वसुली करावी असे आदेश त्यांनी काढले आहेत.  केवळ आदेश काढून ते थांबले नाहीत तर गुरुवारी स्वतः रस्त्यावरही उतरले.

येथील हरिभाऊनगर भागातील एका व्यक्तीच्या घरी वैष्णोदेवीचे दर्शन घेवून आल्याने प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यानिमित्त स्नेह भोजनही होते. या करीता जिल्हाधिकारी तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी प्रसाद घेतला. स्नेहभोजनही केले. पण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता ती तीन मजली इमारत होती. याचा मालमत्ता कराचा भरणा केला का? अशी विचारणा केली.

कराचा भरणा केला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी या भागातील बिल कलेक्टरला बोलावले. त्याच्याजवळून पावती बुक घेतले. स्वतः पावती फाडून घऱमालकाला देत तीस हजार रुपये कराची वसुली केली. कलेक्टरच बिल कलेक्टर बनल्याचा अनुभव मात्र उपस्थितांनी घेतला.

ज्यांनी कराचा भरणा केलेला नव्हता अशांनी मात्र तेथून काढता पाय घेतला. जी. श्रीकांत यांनी रात्री गंजगोलाई, कापडलाईन आदी भागात फिरूनही काही व्यापाऱय़ांकडून कराची वसुली केली आहे. आयुक्तच कामाला लागल्याने अधिकारीही वसुलीच्या कामाला लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT