Latur Food Poisoning News
Latur Food Poisoning News 
मराठवाडा

Food Poisoning: चकलीच्या खव्यातून विषबाधा? उदगीर तालुक्यातील घटनेने खळबळ

सचिन शिवशेट्टे

उदगीर (जि.लातूर) : वाढवणा बुद्रूक (ता.उदगीर) येथे रविवारी (ता.२४) लग्नसमारंभात  जेवणातून  विषबाधा झाल्यामुळे १२७ बाधित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या  रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आज सोमवारी (ता.२५) सायंकाळपर्यत सर्वांना सुटी देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी दिली. व्यापारी इसाक हवालदार यांच्या मुलीचा विवाह रविवारी पार पडला.

या विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवण केले. जेवणानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्यामुळे  प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालयात रात्री उशिरापर्यत १२७  रुग्णाला त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारानंतर अनेकांना घरी पाठवण्यात आले होते. यापैकी गंभीर परिस्थितीमुळे २२ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्या पैकी ९ रुग्णाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. २२ रुग्णांपैकी १५ रुग्णाला उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. तर ७ रुग्णाला सायंकाळपर्यत घरी पाठवण्यात येणार आहे. विषबाधा झाल्यानंतर वरिष्ठ आधिकाऱ्‍यासह तज्ज्ञ डॉक्टरचा चमु ठाण मांडुन होता.   


चकलीच्या खव्यातुन विषबाधा झाल्याचा अंदाज
लग्नातील जेवनात गोड पदार्थ म्हणून ठेवण्यात आलेल्या चकलीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या खव्यातून  विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लातुर येथील प्रयोगशाळेत खवा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तपासणी अवाहल येण्यास दोन दिवस लागणार आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच खरे कारण कळणार आहे.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT