corona.jpg 
मराठवाडा

Corona Breaking : लातूरच्या माजी उपमहापौरांसह दोन डॉक्टरांना कोरोना; एका वृद्धाचा मृत्यू

हरी तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरु असलेल्या औराद शहाजनी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी (ता. ११) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३४ वर गेली आहे.

पहिल्या तीन चार लॉकडाऊनमध्ये सुरक्षीत असलेला लातूर जिल्हा मराठवाड्यात कोरोना बाधितांच्या संख्या तिसऱय़ा क्रमांकावर आहे. त्यात गेल्या पंधरा वीस दिवसात कोरोनामूळे बाधित होवून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. दोन दिवसापूर्वी तर एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व वृद्ध व विविध आजार असलेले ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यात औराद शहाजनी येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.

त्याला येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना शनिवारी (ता. ११) रात्री या व्यक्तीचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यापासून चोवीस तासाच्या आत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या या संस्थेतील अतिदक्षता विभागात ३० जणांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या बाबतीत लातूरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

लातूरच्या माजी उपमहापौरांना कोरोनाची लागण

लातूर महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर तसेच विद्यमान नगरसेवक यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच येथील शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले असून या सर्वांवर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरु आहेत. आपली प्रकृती चांगली असून नागरीकांना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. श्री. पवार यांचा वाढदिवस काही दिवसापूर्वीच साजरा झाला होता. त्यावेळी माजी उपमहापौर त्यांच्या संपर्कात आले होते. त्यांचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वॅब घेवून तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवला होता. त्याचा शनिवारी रात्री पॉझिटीव्ह अहवाल आला. त्यांच्यावर सध्या या संस्थेत उपचार सुरु आहेत. आपली प्रकृती चांगली असून नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही माजी उपमहापौरांनी केले आहे.

दरम्यान येथील खोरी गल्लीतील एक डॉक्टर पॉझिटीव्ह आले आहेत. ते स्त्री रुग्णालयात कार्यरत आहेत. तसेच विलाससराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एक डॉक्टरही कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. आतापर्यंत शासकीय रुग्णालयातील नऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. काही नर्सेस देखील कोरोनाग्रस्त झाल्या आहेत.

संपादन : प्रताप अवचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT