Latur News
Latur News 
मराठवाडा

अखेर पोलिसांनी जोडले लातूरकरांसमोर हात

सुशांत सांगवे

लातूर : घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही संचारबंदी पाहण्यासाठी तरूण वर्ग बाहेर पडताना दिसत आहे. पोलिसांनी दंडूका उगारला तरी विनाकारण बाहेर फिरणारे अजूनही दिसू लागले आहेत. त्यामुळे अखेर गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत बाहेर येणाऱ्यांसमोर पोलिस अधिकारी-कर्मचारी हात जोडताना दिसत आहेत. हे दृष्य गंजगोलाई भागात शनिवारी पहायला मिळाले.

संचारबंदी लागू झाल्यामुळे विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरवात केली. पोलिसांच्या भीतीपोटी अनेकांनी बाहेर पडणे टाळले. पण, पोलिसांवरच टीका झाली. सोशल मीडियावरही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी आपला हात आखडता घेतला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यातच पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने यांनी ‘बाहेर फिरणाऱ्यांची आधी विचारपूस करा. मगच कायदेशिर कारवाई करा’, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोलिस कोणालाही मारताना दिसले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर बिनधास्तपणे बाहेर येणाऱ्याची संख्या आता वाढू लागली आहे. काहीजन तर आपल्या लहान मुलांना बाहेर घेऊन येऊ लागले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

शहरातील प्रत्येक चौकात पोलिस पहायला मिळत आहेत. काही चौकात येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी होत आहे. तर काही चौकात नागरिकांची चौकशीही होताना दिसत नाही. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांना आणखी बळ मिळत आहे. काही नागरिक या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी होत आहे. सध्या भाजी विक्रेत्यांच्या ठिकाणी असे चित्र पहायला मिळत आहे. अशावेळी योग्य ती दक्षता नागरिक घेताना दिसत नाहीत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

एकाच वेळी अधिक लोकांनी एकत्र येणे, चुकीचे आहे. यामुळे संगर्स वाढू शकतो, असे सांगूनही भाज्यांच्या खरेदी-विक्रीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे गंजगोलाई, इदगाह मैदान या भागातील फळ-भाजी विक्रेत्यांची आणि ग्राहकांची होणारी गर्दी कधी आटोक्यात येणार, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. मात्र, किराणा दुकानांत होणारी गर्दी गेल्या दोन दिवसांपासून आटोक्यात आल्याचेही पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT