Corona and Omicron Update sakal
मराठवाडा

Marathwada Corona Update : ८७३ कोरोनाग्रस्त

आठ जिल्ह्यांतील दिवसभरातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना (Marathwada Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून सोमवारी (ता. १०) दिवसभरात ८७३ जणांना संसर्गाची लागण झाली. रविवारी (ता. ९) दिवसभरात ६२९ रुग्ण आढळले होते.

औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) क्षेत्रात २७६ तर ग्रामीण भागात ४१ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लाख ५१ हजार १८३ वर पोचली आहे. १ हजार १४१ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी ३२ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २८ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ४६ हजार ३८४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत तीन हजार ६५८ जणांचा मृत्यू झाला आहे. (Corona and Omicron Update Latest News)

जालन्यात ३७ रुग्ण

जालना जिल्ह्यात ३७ जण कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ६२ हजार ३१० असून ६० हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. १६१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २०२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

लातुरमध्ये संख्या वाढतीच

लातूर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (ता. नऊ) १५५ नवे रुग्ण समोर आले. पॉझिटिव्हीटी रेट आता ८.४ टक्के झाला आहे. काल एक हजार ९० आरटीपीसीआर चाचणीतून ८० तर ७४८ ॲन्टीजेन चाचणीतून ७५ जण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ९३ हजार ५६२ वर पोचली असून ९० हजार ५६८ रुग्ण बरे झाले आहेत. ५४० जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार ४५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये १६४ बाधित

नांदेड जिल्ह्यात १६४ जण कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ९१ हजार १४५ वर पोचली आहे. ८७ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५४४ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार ६५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

परभणीत ६८ रुग्ण

परभणी जिल्ह्यात ६८ जण कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ५१ हजार ७८३ असून ५० हजार २१२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २७२ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एक हजार २९९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात बारा रुग्ण आढळले. सध्या ४७ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या १६ हजार १२१ असून १५ हजार ६७८ रुग्ण बरे झाले आहेत.

अशी रुग्णवाढ

औरंगाबाद ३१७, नांदेड १६४, लातूर १५५, उस्मानाबाद १०४, परभणी ६८, जालना ३७, बीड १६, हिंगोली १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाआधीच भाजपचा दबदबा; १०० उमेदवारांची बिनविरोध निवड

Pune RTO : नवले पूल अपघातानंतर आरटीओ ॲक्शन मोडवर! २० चालकांच्या डोळ्यांत दोष, कायमस्वरूपी तपासणी केंद्राची मागणी

Latest Marathi News Live Update: रामटेकजवळ भीषण अपघात, दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू

India VS South Africa: वनडे मालिकेसाठी रिषभ पंत, राहुल कर्णधारपदाच्या शर्यतीत; शुभमन गिल तंदुरुस्त होण्याची शक्यता फारच कमी

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT