matdan vote.jpg
matdan vote.jpg 
मराठवाडा

मराठवाड्यात सुशिक्षित मतदारांचा मतदानास निरुत्साह 

सुहास सदाव्रते

जालना : सुशिक्षित असलेल्या पदवीधर मतदार संघात मतदानास मतदारांचा निरुत्साह दिसून आला. पदवीधरांचे प्रलंबित असलेला अनुदान, जुनी पेन्शनसह सीएचबी प्रश्न कायम असल्याने त्यातच दोन दिवस सुटीसह मतदानास उदासीनता दिसून आली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
मराठवाडा पदवीधर निवडणूक मतदानास सुशिक्षित असलेल्या मतदारांचा उत्साह फारसा दिसून आला नाही. लोकसभा,विधानसभा यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाची किमान ८० ते ९५ टक्केवारी असते.परंतु सुशिक्षित, नोकरदार मतदार अधिक असलेल्या मतदारसंघात मतदान टक्केवारी मोठा चिंतनाचा व अभ्यासाचा विषय आहे. 

जिल्ह्यातील ७४ बुथवर मतदारांनी आपला हक्क बजावला. जिल्ह्यात २९ हजार ७६५ मतदारांनी नोंदणी केलेली होती.एकूण झालेली नोंदणी आणि मतदानाची आकडेवारी पाहता टक्केवारी कमीच आहे. इतर निवडणुकीत मतदानाची टक्केवारीची आकडेवारी पाहता सुशिक्षित असलेल्या पदवीधर मतदारांची टक्केवारी चिंताजनक बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जालना शहरात ९ हजार १० मतदार आहेत. परंतु मतदानाच्या दिवशी शहरातील मतदान केंद्रावर बराच वेळ शुकशुकाट पाहायला मिळाला.

ग्रामीण भागात मतदानास उत्साह काहीसा दिसून आला, तसा शहरी भागात दिसून आला नाही. वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षक अनुदान, जुनी पेन्शन योजना यासह वरिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिकेवर काम करणारे शेकडो प्राध्यापक यांचे प्रश्न कायम आहेत. यामुळेच कदाचित मतदानास उत्साह दिसून येत नसल्याची चर्चा मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या विविध पक्षांच्या मंडपात असलेल्या संपर्क कक्षात दिवसभर सुरु होती. सलग दोन दिवस आलेल्या सुट्यांचा परिणामही मतदानावर झाला असल्याचे संतोष राजगुरू यांनी सांगितले. जालना शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर पाच तासात मतदानाची आकडेवारी पंचवीस टक्क्यांच्या पुढे गेली नव्हती. 
 

पदवीधरांचे प्रश्न कायम आहेच.समस्या सुटलेल्या नाहीत. राजकीय पक्षांकडून पूर्णच प्रश्न सोडविले जातील असेही नाही.दोन दिवस सलग सुट्याही होत्या.सुशिक्षित मतदारांची मतदान टक्केवारी कमी असणे ही चिंतनाची बाब आहे. 
ज्ञानोबा वरवट्टे, केंद्रीय सदस्य, मराठवाडा शिक्षक संघ 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT