Latur Asmita success.jpg 
मराठवाडा

'करोडपती'च्या शोमध्ये लातूरची अस्मिता 'लखपती'

हरी तुगावकर

लातूर : चित्रपट सृष्टीतील दिग्गज असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून आपल्या गुणवत्तेची चुनूक दाखवत येथील अस्मिता गोरे या विद्यार्थीनीने कौन बनेगा करोडपती शोमध्ये साडे बारा लाख रुपये जिंकले. येथील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया अस्मिताचे वडिल अंध असून आई एका डोळ्याने अंध आहे. घराची जबाबदारी अंगावर घेत अस्मिताने हे यश मिळवले आहे. या यशाबद्दल तीचा महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. 

येथील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अस्मिता माधव गोरे हीने गुरुवारी (ता. सात) झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्येही सहभाग घेतला. चित्रपट सृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नाला तीने आत्मविश्वासाने उत्तरे दिली. या शोमध्ये तीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर साडे बारा लाख रुपये जिंकले. अस्मिताचे वडील अंध असून आईही एका डोळ्याने अंध आहे. वयाच्या केवळ 22 वर्षी आपल्या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर पेलणार्‍या अस्मिताचे कौतूक होत आहे. 

या यशाबद्ल बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात तीचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रेरणा आणि प्रोत्साहन हे सक्षम यशाचे दोन पैलू असतात. त्याच्याच जीवावर माणूस आपल्या जीवनात हवी ती ध्यैय आणि उद्दीष्टे साध्य करु शकतो. याचा साक्षात्कार ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये झेंडा रोवणारी विद्यार्थीनी अस्मिता गोरे हिने करुन दाखविला आहे, असे मत बिडवे यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक मन्मथअप्पा येरटे, प्राचार्य नरेंद्र खडोट, प्रा. धर्मराज बिरादार, प्रा. श्रीकांत तांदळे उपस्थित होते. 

अभियांत्रिकीनंतर अस्मिताला एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षा देऊन प्रशासकिय सेवेतील मोठे अधिकारी व्हायचे आहे. तीचे स्वप्न साकार करण्यासाठी बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बिडवे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी तीला स्पर्धा परीक्षांच्या काही निवडक व दर्जेदार पुस्तकांचा संचही भेट देण्यात आला.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT