nanded
nanded  sakal
मराठवाडा

Nanded News : रस्त्यांवरच थाटतोय बाजार; व्यापारी त्रस्त वाहतुकीचेही तीनतेरा, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - शहरात सणासुदीच्या काळात रस्त्याच्या मधोमध किरकोळ व्यावसायिक दुकाने थाटत असल्यामुळे मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम होत असला तरी वाहतुक नियमांचे तीनतेरा वाजत आहेत. यासंदर्भात महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि शहर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखा कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाही. यावेळी सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे

दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. तसेच दिवाळी सणाचेही नागरिकांना वेध लागले आहेत. यानिमित्त कपड्यांसह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठांमध्ये वर्दळ होत आहे. किरकोळ दुकानांसह बड्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. शहरातील वजिराबाद, कलामंदिर, डॉक्टर लेन, श्रीनगर, गाडीपुरा, इतवारा, सराफा गल्ली आदी भागांमध्ये किरकोळ व्यावसायिकांची चंगळ दिसून येत आहे.

रस्त्यातच दुकाने थाटली जात असल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळित होत आहे. रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. त्यासोबतच बड्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. या सर्व प्रकारावर मनपा अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. उलटपक्षी मनपातर्फे या व्यावसायिकांकडून दहा ते वीस रुपयांची पावती वसुल करत असल्याचा आरोपही होत आहे. या किरकोळ व्यावसायिकांना दुसरी जागा देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही

किरकोळ व्यावसायिकांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यांच्यामुळे वाहतुक व्यवस्था तर विस्कळित होतेच. शिवाय रस्त्यावर दुतर्फा कचरा आणि धुळीचेही साम्राज्य निर्माण होत आहे.

- रामेश्वर जाधव, पानपट्टी व्यावसायिक, वजिराबाद.

आधीच शहरातील रस्ते अरुंद. त्याच रस्त्यांवर फेरीवाल्याच्या रोज गाडे उभे असतात. सणासुदीत किरकोळ व्यावसायिकांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. वाहनचालक आमच्या दुकानांसमोर वाहने उभी करतात. पालिकेने वर्दळीच्या ठिकाणी वाहनतळाची निर्मिती सणासुदीच्या काळात तरी करायला हवी.

- गोविंद मनियार, कापड व्यापारी, श्रीनगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT