File photo 
मराठवाडा

ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाबाधिताचा मृत्यू?

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधिताचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृताने उपचारादरम्यान भावाला पाठविलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये अशा प्रकारचे आरोप प्रशासनावर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 

आसू (ता. परंडा) येथील एकाला निमोनियाच्या कारणावरून बार्शी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्याला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रविवारी (ता. पाच) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मृताच्या भावाने ‘सकाळ'शी बोलताना सांगितले, की माझा भाऊ उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ३० जूनला दाखल झाला होता.

मात्र कोणीही दखल घेतली नाही. भावाने दिलेल्या माहितीनंतर मी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. खासदारांच्या सूचनेनंतर प्रशासनाने उपचार सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ऑक्सीजन सुरू नव्हता. तसेच डॉक्टरही नसल्याचे भावाने सांगितले. त्यामुळे पुन्हा मी खासदारांना पहाटे तीन वाजता फोन लावून माहिती दिली.

खासदारांनी प्रशासनाला पुन्हा सांगितल्यानंतर ऑक्सीजन सुरु केला. मात्र त्यानंतर पुन्हा तीन चार दिवस रात्रीच्या वेळी माझ्या भावाला ऑक्सीजन पुरवठा झाला नाही. अखेर रविवारी (ता. पाच) पहाटे भावाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

उपचारातील हलगर्जीपणामुळे आमच्यासोबत असे घडले. इतर कुणासोबत असे घडू नये. काय प्रकार आहे, ते कळत नाही. मात्र ऑक्सिजन दिला नाही. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला. 
- मृताचा भाऊ 

रुग्ण अत्यवस्थ असल्याने उपचारास प्रतिसाद देत नव्हता. आम्ही ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवला होता. आमच्याकडून रुग्णाची योग्य ती काळजी घेतली जात होती. 
- डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today : नाताळाच्या एक दिवस आधी सोने ४ हजारांनी महागले, चांदीतही ९ हजारांची वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

होऊदे खर्च! ७ कोटींना नव्या थार गाड्यांची खरेदी, मॉडिफिकेशनवर ५ कोटी खर्च; वन विभागाची उधळपट्टी, चौकशीचे आदेश

CJI Suryakant: ‘केस जिंकण्यापलीकडे काहीतरी मोठं…’ ; भारताच्या भविष्यासाठी CJI सूर्यकांतांनी वकिलांना दिला वेगळाच फॉर्म्युला

Cold Wave Maharashtra : राज्यात हवामान बदल; कोकणात गारठा, पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा; मुंबईच्या राजकारणाला मिळणार नवे वळण

SCROLL FOR NEXT