News About School Bus Inspection 
मराठवाडा

औरंगाबादमध्ये स्कूल बसची तपासणी गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - राज्यातील स्कूल बसची तपासणी करून अहवाल पाठविण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले होते; मात्र जिल्ह्यातील स्कूल बस तपासणी अद्याप गुलदस्त्यात आहे. या तपासणीबद्दल आरटीओ कार्यालयाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

राज्यातील स्कूल बसचे वाढते अपघात रोखण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने राज्यभर स्कूल बस तपसाणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परिवहन विभागाच्या आदेशाप्रमाणे राज्यभर स्कूल बसची तपासणी सुरू करण्यात आली आहे; मात्र औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने अद्यापही व्यापक मोहीम सुरू केली नाही, ही गंभीर बाब आहे. स्कूल बसच्या फिटनेस तपासणीचा
महत्त्वाचा भाग असतो. स्कूल बसची प्रत्येक वर्षी फिटनेस तपसाणी करून घेणे आवश्‍यक असते; मात्र स्कूल बसच्या फिटनेस तपासणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते.

आरटीओ कार्यालयातर्फे वारंवार स्कूल बस तपासणीसाठी संधी दिली जाते तरीही स्कूल बसचालक तपासणीकडे दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. स्कूल बसला नियमानुसार स्पीड गर्व्हनर बसवणे बंधनकारक केलेले आहे; मात्र शहरातील बेफाम धावणाऱ्या स्कूल बस पाहिल्यानंतर या स्कूल बसला स्पीड गर्व्हरनर आहे किंवा नाही याची शंका येते. एकूणच परिस्थितीने स्कूल बसची सातत्याने तपासणी होणे आवश्‍यक आहे; मात्र आरटीओ कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करते. 

काय होईल - बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या!
 
जिल्ह्यामध्ये 1700 स्कूल बस 
जिल्ह्यामध्ये 1700 स्कूल बस आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होण्याच्या काळात काही प्रमाणात कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर पुन्हा स्कूल बसच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली नाही. गेल्या आठवड्यात परिवहन विभागाने स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतरही आरटीओ कार्यालयाने व्यापक मोहीम सुरू केली नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री काम करण्याचे धोरण आरटीओ कार्यालय राबवीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT