st news.jpg 
मराठवाडा

उत्पन्न नाही तर वेतन नाही, कळंब आगारातील अजब प्रकार  

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एसटीच्या कळंब आगाराचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नाही तर वेतन नाही अशी भूमिका एसटीने घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रावर संकट ओढवले आहे. २२ मार्च ला टाळेबंदी करण्यात आली. तेव्हा काही काळासाठी एसटीची सेवा बंद होती. यामुळे तब्बल सहा महिने एसटी कुलूप बंदवस्थेत होती. अनलॉक मधील काळात सेवा पुर्वरत करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाची वाताहत झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून कळंबच्या एसटीची चाके फिरू लागली आहेत. कोरोनाच्या संकट काळातही एसटीचे कर्मचारी रात्रंदिवस सेवारत असून एसटीचे वाहक, चालक आणि यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्याचे वेतन मिळाले नाही. यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वेतन न मिळाल्याने दैनंदिन गाडा कसा चालवायचा याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. हातउसने तसेच व्याजाने पैसे घेऊन गुजराण करण्याची वेळ कर्मचाऱ्यावर ओढवली आहे. परिणामी कर्मचारी कर्जबारी झाले आहेत. सध्याही कोरोनाचा संक्रमण काळ सुरू आहे. याही काळात कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रवाशाना सेवा देत आहेत. मात्र, याच कर्मचाऱ्याना पगारापासून वंचित राहावे लागत आहे. तीन महिन्यापासून त्यांना पगार देण्यात आला नसल्याने एसटी कर्मचाऱ्याचें कुटूंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एसटीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे वेतनाची मागणी केली असता, उत्पन्न नाही त्यामुळे पगार पण नाही अशी भूमिका घेत असल्याचे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कर्मचारी झाले कर्जबाजारी 
एसटीमध्ये नौकरी असल्याने ती सोडता येईना,सोडली तर दुसरं काय करावं असा मोठा प्रश्न कर्मचारयापुढे उभा ठाकला आहे.वेतन मिळाले नसल्याने प्रापंचिक गरजा कशा भागवाव्यात असा चिंतेचा प्रश्न त्यांच्या कुटूंबियापुढे आहे.त्यामुळे आज उद्या पगारी मिळतील या आशेवर कर्मचाऱ्यांनी व्याजाने तसेच हातुसने पैसे घेऊन अडचणींवर मात केली आहे. त्यामुळे कर्मचारी कर्ज झाले आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा! किरकोळ वादातून दोन निर्घृण खून, सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

Beed News: घरकुल घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; केज येथील ‘सकाळ’ने उघड केलेला सव्वाचार कोटींचे प्रकरण

Nashik Highway: नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली; वाहनचालकांसह प्रवासी संतापले, टोल भरूनही त्रास!

Kolhapur Girl End Life : कल्याणीला भिती नववी नापास होण्याची, कोणालाही न सांगता तिने जे केलं ते धक्कादायक; कोल्हापुरातील घटनेने हळहळ

Latest Marathi News Live Update : खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेणार

SCROLL FOR NEXT