गोकुळवाडी तांडा (ता. बदनापूर) : येथील उत्तम चव्हाण यांचे घर.  
मराठवाडा

वयोवृद्ध जन्मदात्यांवर लेकाचे कुऱ्हाडीने वार 

सकाळ वृत्तसेवा

बदनापूर (जि. जालना), ता. 3 : गोकुळवाडी तांडा (ता. बदनापूर) येथे वयोवृद्ध जन्मदात्यांवर लेकाने कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात आई जागेवरच ठार झाली, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही मनाला चटका लावणारी घटना गुरुवारी (ता. दोन) रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या डोक्‍यावर परिणाम झाल्याने त्या भरात त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, गोकुळवाडी तांडा येथे मोलमजुरी करणारे उत्तम घुमाजी चव्हाण (वय 70) व ठकूबाई उत्तम चव्हाण (वय 60) असे वयोवृद्ध दांपत्य वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले असून, एक मुलगा त्याच्या सासुरवाडीला राहतो, तर दुसरा शेजारीच राहतो. मात्र तो सध्या ऊसतोडीच्या कामाला बाहेरगावी गेला आहे. त्यांचा तिसरा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण (वय 36) हा काहीसा मनोरुग्ण असून त्याच्या पत्नीने त्याला सोडले आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता. दोन) रात्रीचे जेवण झाल्यावर उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई ठार झाल्या, तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत नातीने ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर उपसरपंच कल्याण पवार, राजू राठोड, सुभाष चव्हाण, बाळू चव्हाण यांनी तत्काळ बदनापूर पोलिसांना संपर्क साधला.

पोलिस मुख्य जमादार नितीन ढिलपे, किशोर पुंगळे, श्री. बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात आई-वडिलांवर वार करून त्याच ठिकाणी बसलेल्या दिलीपला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच उत्तम चव्हाण व ठकूबाई चव्हाण यांना बदनापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीही न करता दोघांना जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर ठकूबाई मृत असल्याचे जाहीर केले. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भिमाळे करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Sugar Rate Hike : विक्रमी दरवाढीमुळे साखर ‘कडू’! दर ७० ते ७२ रुपयांवर; सण-उत्सवावर महागाईचे सावट

‘Toxic’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात! स्पीकर स्टँड कोसळला, ४ जण जखमी; यशने थांबवलं भाषण

Marathi News Live Updates : अमरावती रुग्णालययात पाहणी करून माहिती घेणार- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Bhuleshwar Ganesh Idol Collapse Video : भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळल्याचा VIDEO समोर; मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT