Beed Accident News
Beed Accident News esakal
मराठवाडा

Beed Accident : अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर मोठा अपघात; एक ठार, १९ जण जखमी

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.लातूर) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा जागीच मृत्यू, तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई-लातूर रस्तावर सायगाव जवळ शनिवारी (ता.१९) पहाटे दीडच्या सुमारास झाला. अपघातातील मृत आणि जखमी हे लातूर (Latur) जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत. आजनी येथील ठाकूर कुटुंबीय इतर नातेवाईकांसह वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी पिकअप (एमएच २४ एबी ६६२४) या वाहनातून अहमदनगरला (Ahmednagar) जात होते. रस्त्यात ते नंदगोपाल डेअरीजवळ पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून उतरले होते. थोड्यावेळाने सर्वांना वाहनात बसवून पिकअप चालक ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर (वय ४२) हे मागील बाजूचा फालका लावत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेंपोने पिकअपला जोरदार धडक दिली. (One Died, 19 People Injured In Accident On Ambajogai Latur Highway In Beed)

या अपघातात दोन्ही वाहनात चिरडून ज्ञानेश्वर ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअपमधील उर्मिला उद्धव ठाकूर (४०), खंडू बळीराम खाणशेट्टी (४५), मुकेश उद्धव ठाकूर (१२), दैवाशाला ठाकूर (४०), रुख्मिनबाई नामदेव ठाकूर (६०), रुपाली गोविंद ठाकूर (११), रेणुका गोविंद ठाकूर (३९), कलावती बाजी येरांडे (४८), रावसाहेब शिंदे (४४), गजानन बालाजी शिंदे (२७), गंगाधर रामा कोरे (७०), अजय माधव शिंदे (१२), बालाजी मुक्ताराम ठाकूर (३७), कमलबाई ठाकूर (६०), ओंकार ज्ञानेश्वर ठाकूर (१५), मेघा ज्ञानेश्वर ठाकूर (३८), मनुबाई गणशेट्टी (७०), विष्णू ज्ञानेश्वर ठाकूर (१२, सर्व रा. आजनी बु.) आणि अर्चना माधव शिंदे (३५, रा. घनसावरगाव) हे जखमी झाले. सध्या १२ जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून एकास लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत केली. दरम्यान, अपघातानंतर टेंपोचालकाने घटनास्थळाहून टेंपोसह पळ काढला. (Beed Accident)

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर बर्दापूर ते सायगाव दरम्यान अपघातांची मालिका सुरुच आहे. हा राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने या भागात सतत अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याने हा रस्ता रुंद करण्याची गरज आहे. या भागात किमान ठिकठिकाणी ‘अपघात प्रवण क्षेत्र’ असे फलक तरी लावावेत. त्यामुळे वाहनचालक अधिक सावधतेने वाहन चालवून या अपघातांवर काही प्रमाणात तरी नियंत्रण येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT