बीड जिल्ह्यात अपघातानंतर वाहनांची झालेली अवस्था.
बीड जिल्ह्यात अपघातानंतर वाहनांची झालेली अवस्था. 
मराठवाडा

बीड जिल्ह्यात तिहेरी अपघात, एक ठार, तीस कामगार जखमी

सकाळ वृत्तसेवा

गेवराई (जि. बीड) - औरंगाबादहून गेवराईकडे भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकी आणि आयआरबीच्या कामावर सिमेंट व मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. तिहेरी अपघातात एक महिला जागीच ठार, तर तीस कामगार जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.18) नागझरी फाट्याजवळ घडली. सर्व जखमींवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून काही जणांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात ट्रॅक्टरमध्ये आईच्या कुशीत बसून प्रवास करणाऱ्या एक वर्षाच्या चिमुकलीला कसल्याच प्रकारची जखम झाली नाही, हे विशेष. औरंगाबादहून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने नागझरीजवळ एका मोटारसायकलला मागून जोराची धडक दिली यात आकाश मापारे (वय 22) हा तरुण जखमी झाला. या भीतीने आणखी वेगात जणाऱ्या कंटेनरने अर्धा किलोमीटरवर आयआरबीच्या कामावर सिमेंट व ३० कामगार घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली.

या अपघातात रेखा सुरेश रावत (वय 21, रा. गुजरात) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात रमेश श्रीराम पवार (वय 35), देवराज मोहन (16), बिरेंद्र धारू (21), रेखा सायरिष (20), जयेश राजू (20), नीता मेहता (20), नारायण मापाडी (26), अंजू रामशिंग चव्हाण (22), रावल प्रमिला (23), जयलेश रावत (13), भुरी शैलेश (13), नेहाते सुमन (40), पप्पी मेहता (18), रंजित मेहता (28), पिनू रावत (19), मिनास रावत (19), जसवंत (27), रेखा रफाळ (40), दिलीप रफाळ (19), हजू जाट रावत (40), नीता रायफळ (19), गुड्डी रायफळ (2), हितेश (2), देवा मोहन (18), धारू मोहन (21), उषा अजय (27), महेश रूपा (20), सुशील रमेश (18), रमेश धिंडे (46), शैलेश रावत (18) हे जखमी आहेत. त्यांच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्व जखमींवर डॉ. राजेश शिंदे यांच्यासह डॉ. काकडे, डॉ. सराफ, डॉ. गोविंद लेंडगुळे, डॉ. आंधळे, डॉ. मुक्तार, जाधव, सुगडे, खंदारे, वाळवी, माळवे, जाधव, गणेश नाईकनवरे, वखरे, पवार यांनी प्राथमिक उपचार केले. अपघात स्थळावरून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी बाळासाहेब मस्के यांनी मदत केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT