A one to one and a half year old girl was found crying on the side of the road at Vaidyanath Gans Agency on Nathchitra Mandir Road around 12 noon on Wednesday 3.jpg 
मराठवाडा

परळी वैजनाथमध्ये बेवारस बालिकेला नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) :  शहरातील नाथ चित्र मंदिरच्या रस्त्यावर एक बेवारस बालिका आढळून आली. ही बालिका बऱ्याच वेळापासून रस्त्याच्या कडेला रडत असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी बालिकेला पाहिले. तत्काळ या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात कळविण्यात आली. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येवून बालिकेला ताब्यात घेतले आहे.

शहरातील नाथचित्र मंदिर रस्त्यावरील वैद्यनाथ गँस एजन्सीच्या परिसरात बुधवारी (ता.१६) बाराच्या सुमारास एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला रडताना दिसून आली. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी तिला पाहिले. उपस्थित नागरिकांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांनी बालिकेला बिस्किटे व पाणी दिले. 

सकाळपासून त्या बाळाची आई या बालिकेला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती. मात्र, दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-रडून थकून गेल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच वेळ त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न करूनही ती न सापडल्यामुळे शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी तात्काळ पोलिस वाहन व सोबत हवालदार श्री. तोटेवाड, महिला पोलिस श्रीमती डोरले यांना पाठवून बाळाला ताब्यात घेतले आहे. बालिकेच्या आईचा शोध पोलिस घेत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT