download.jpg 
मराठवाडा

उस्मानाबाद कोरोना : ४६६ अहवालापैकी आज १३३ जण पॉझिटिव्ह, एकूण बाधितांची संख्या ९९१ वर  

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये १३३ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा तिन आकडी रुग्णसंख्या आल्याने आता चिंता व्यक्त होत आहे. सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यामध्ये ६७ जण सापडले आहे. उमरगा येथे ३२, वाशी नऊ, तुळजापुर १६, कळंब तीन, परंडा दोन, भुम दोन, लोहारा एक अशा १३२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९९१ झाली आहेत. 

जिल्ह्यातील ४६६ अहवाल पाठविण्यात आले होते. त्यातील ४५२ अहवाल प्राप्त झाले असुन १४ लोकांचे अहवाल अजुनही प्रलंबित आहेत. उस्मानाबाद शहरातील काकडे प्लॉट, राम नगर, प्रसाद कॉलनी, समर्थ नगर, लहुजी नगर, सावरकर चौक, वैराग रोड, राजीव गांधी नगर, जिल्हा मध्यवर्ती, सांजा चौक, गणेश नगर, माणिक चौक, देशपांडे स्टँड, जुना बस डेपो, खाजा नगर, मारवाडी गल्ली, गालिब नगर, आनंद नगर, जिल्हा रुग्णालय निवासस्थान, मध्यवर्ती कारागृह, आदी शहराच्या महत्वाच्या भागामध्येही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसुन येत आहे.

या शिवाय तालुक्यातील शिंगोली, येडशी, वडगाव (सि),ढोकी, सारोळा (बु), घाटंग्री, जुनोनी, कोळेवाडी, उपळा, गावसुद, रुईभर या गावामध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. उमरगा तालुक्यामध्येही ३२ रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९९१ झाली असुन बरे झालेले रुग्ण ४८२ तर उपचार घेत असलेले रुग्ण ४६१ झाली आहे. मृत्यु झालेल्या लोकांची संख्या ४८ इतकी झाली आहे.

Edited By Pratap Awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT