Osmanabad News
Osmanabad News 
मराठवाडा

उस्मानाबाद : ठेकेदाराला मुदतवाढ, शेतकऱ्यांना मात्र वीजजोडणी मिळेना

सयाजी शेळके

उस्मानाबाद : वीजजोडणी देणाऱ्या ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून वीजजोडण्या मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर असून कंत्राटदाराला पाठीशी का घातले जात आहे? असा प्रश्‍न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. तर वरिष्ठ स्तरावरून ठेका निश्‍चित झाल्याने मंत्र्यांपर्यंत याची साखळी असल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.

जिल्ह्यात मार्च २०१८ अखेर साडेसहा हजार शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी वीज कंपनीकडे पैसे भरले आहेत. अद्यापही त्यांना वीजजोडणी मिळालेली नाही. मार्च २०१८ मध्येच एचव्हीडीएस योजनेतून जिल्ह्यात सहा हजार ९३३ वीजजोडणी देण्याचे निश्‍चित झाले. २६ नोव्हेंबर २०१८ मध्येच मुंबई येथील व्होल्टास कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंपनीने पहिले अनेक महिने कामाला सुरूवात केली नाही. १११ कोटी रुपयांच्या या कंत्राटाच्या कामाला रखडतच सुरुवात झाली.

त्यानंतर कंपनीने वेळेत काम पूर्ण केले नसल्याने मुदतवाढ मागितली. कंपनीला २२ जानेवारी २०२० ही पूर्णत्वाची तारीख देण्यात आली. मात्र कंपनी वेळेत काम करू शकली नाही. जेमतेम शेतकऱ्यांनाच एचव्हीडीएसद्वारे जोडणी मिळाली. त्यानंतर १५ मे पर्यंत चार हजार ८०१ शेतकऱ्यांना वीजजोडणी पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र नव्याने दिलेले उद्दीष्टही कंत्राटदार पूर्ण करू शकला नाही. आता जून महिना उजडला आहे. मात्र अद्यापही कामे पूर्ण झालेले नाही.

कामाची कासवगती संपेना
मार्च २०१८ मध्ये जेव्हा कामाचे आदेश देण्यात आले, तेव्हा सहा हजार ९३३ शेतकऱ्यांना जोडणी देण्याचे आदेश होते. आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र केवळ १६७ शेतकऱ्यांनाच वीजजोडणी पूर्ण झाली आहे. तर केवळ एक हजार ८९४ शेतकऱ्यांना जोडणी देण्याचे काम सुरू आहे.

कंपनीला आशिर्वाद कोणाचा?
जर एखादी कंपनी वारंवार मुतदवाढ देऊनही काम करीत नसेल तर तिला मुदतवाढ कशासाठी दिली जात आहे. राजकीय नेत्याच्या पाठिंब्याशिवाय अशी मुदतवाढ मिळत नाही. असा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. शेतकऱ्यांना वीजजोडणी केव्हा देणार? तीन वर्षे शेतकऱ्यांनी पैसे भरूनही जर जोडणी मिळत नसेल तर पैसे भरून घेतलेल्या रकमेवर व्याज तरी द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT