नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : सोलापूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जळकोट (ता. तुळजापूर) जवळ केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरने आज (शुक्रवार) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्यामुळे पूर्ण आकाशात धुराचे लोट पसरले होते.
आठ किलोमिटर अतरावरील नळदुर्ग येथूनही हे धुराचे लोट स्पष्ट दिसत होते. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी आद्याप ठप्प आहे. ट्रकच्या मागच्या बाजूला आग लागल्याचे जाणवताच ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. चालक व क्लीनर गाडीतून उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. माञ, हा ट्रक रसायन घेऊन कोणत्या दिशेने जात होता हे समजले नाही. या घटनेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. माञ, राष्ट्रीय महामार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच हा ट्रक पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.