corona.jpg 
मराठवाडा

Coronavirus : उस्मानाबादेतील क्वारंटाईन कक्षातले दोघे पॉझिटिव्ह, खाजगी रुग्णालयही सील करणार 

तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  खानापुर (ता. उस्मानाबाद) येथील एक जण सोलापुरातील रुग्णालयात दाखल असून त्याचाही अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. चार दिवसांपूर्वी येथील शहरातील एका रुग्णालयामध्ये तो उपचारासाठी आल्याने त्या रुग्णालयाला देखील सील करण्यात येणार आहे. या शिवाय शहरातील अन्य दोघांचेही अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे लोक क्वारंटाईन कक्षात असल्याने त्या ठिकाणी अन्य लोकांनाही बाधा होण्याचा धोका वाढला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 
शहरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दररोज वाढ होत असून आज आणखी काही ठिकाणे सील करण्यात आल्याचे दिसून आले. जिल्ह्यामध्ये जवळपास साडे तीनशेच्या जवळपास बाधित रुग्णांचा आकडा गेल्याचे चित्र आहे. त्यातही शहरामध्ये बाधित रुग्णांचा संपर्क झाल्याने शहरातील चिंता वाढली आहे. खानापुर (ता. उस्मानाबाद) येथील रुग्णाला उपचारासाठी शहरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले.

त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो पुढील उपचारासाठी सोलापूरला गेला होता. तिथे त्याच्यावर उपचारा अगोदर स्वॅब घेण्यात आला. त्याच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यानी तातडीने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाला कळविले होते. तेव्हा या रुग्णाचा अन्य काही ठिकाणी संपर्क झालेला आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी तातडीने रुग्णांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सूरु केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय त्याच्या रुग्णालयातील कर्मचारी व अन्य रुग्ण यांचा धोका टाळण्यासाठी स्वॅब घेण्यात येणार आहेत.

साहजिकच सार्वजनिक ठिकाणी त्या दरम्यानच्या काळात किती लोक रुग्णालयात आले व किती जणाशी त्याचा संपर्क आला हे सांगणे सध्या तरी कठिण आहे. पण यामुळे निश्चितपणे धोका वाढल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्याही दोघांना कोरोनाची बाधा झाल्याने तेथील अन्य लोकांनाही आता संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे, हा कक्ष देखील सील करण्यात येणार असून सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार आहे.

संपादन : प्रताप अवचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT