000pankaja munde.jpg 
मराठवाडा

'यंदा भगवान भक्तीगड घरीच न्या', पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

दत्ता देशमुख

बीड : कोरोना महामारीच्या संकटामुळे राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी साजरा होणारा दसरा मेळावा यंदा रविवारी (ता.२५) ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. ‘यंदा भगवान भक्तीगड घरीच न्या’, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. 

दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी अनेक वर्षे भगवानगडावर दसरा मेळावा घेतला. दिवंगत मुंडेंच्या पश्चात गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी गडावर राजकीय मेळाव्यांना विरोध केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला. त्यानंतर राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे स्मारक उभारुन भगवान भक्तीगड असे नामकरण करुन मेळाव्याची परंपरा सुरु केली. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मेळावा होणार नाही. मात्र, पंकजा मुंडे दस-याला भगवान भक्तीगडावर जाऊन दर्शन घेतील. तसेच तेथून त्या ऑनलाईन मार्गदर्शन करतील. 

दसऱ्याची ही परंपरा चालूच राहील. मात्र, यंदापुरते भगवान भक्ती गडावर न येता आपापल्या गावी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सीमोल्लंघनाची एक वेगळी परंपरा करू, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावामध्ये घेऊन जा. बाबांचे पूजन करा आणि त्यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शन करेल असेही त्या म्हणाल्या. दसऱ्याला काय कार्यक्रम घ्यायचे, याचे वेळापत्र त्या सोशल मिडीयावरुन कळविणार आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Report: भारतातील श्रीमंत आता वस्तूंवर नाही तर ‘या’ गोष्टींवर खर्च करतायत! Visa च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

Olive Ridley Turtle : 1800 किमीचा अथांग प्रवास! जखमी अवस्थेतून सावरत 'धवललक्ष्मी' कासव रत्नागिरीच्या दिशेने; पाठीवर बसवलेल्या सॅटेलाईट टॅगने उलगडला थरार

Pune News : दोन वर्षांत ५७ बांगलादेशी महिलांची मायदेशी रवानगी; ३२ महिला अद्याप निरीक्षणगृहात

‘डोन्ट माइंड’... लारा दत्ताचा लेकीसोबत भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Credit Card यूजर्ससाठी दिलासा! आता बिल उशिरा भरलं तरी लगेच दंड नाही; RBI चा नवा नियम काय?

SCROLL FOR NEXT